Reshma Shinde Wedding : मराठी सिनेविश्वात गेल्या काही दिवसांपासून रेश्मा शिंदेच्या लग्नाची जोरदार चर्चा चालू होती. अखेर पवनबरोबर लग्नगाठ बांधत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. थाटामाटात पार पडलेल्या लग्नसोहळ्याचे फोटो रेश्माने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकांमुळे रेश्मा घराघरांत लोकप्रिय झाली. छोट्या पडद्यावर तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रेश्मा नेमकं कोणाशी लग्न करतेय याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती.

हेही वाचा : अखेर रेश्मा शिंदेच्या होणाऱ्या नवऱ्याचा पहिला फोटो आला समोर; त्याचं नाव काय? हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पहिलं केळवण, घरगुती मेहंदीसोहळा, हळदी समारंभ, होणाऱ्या नवऱ्याची ओळख असा प्रवास करत आज रेश्मा आणि पवन साता जन्माचे सोबती झाले आहेत. अभिनेत्रीने लग्न लागताना गुलाबी रंगाची साडी नेसली होती. गुलाबी रंगाची नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने, नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर या मराठमोळ्या लूकमध्ये रेश्मा अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या नवऱ्याने लग्न लागताना ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी आणि रेश्माच्या साडीला मॅचिंग असा त्यावर गुलाबी रंगाचा शेला घेतल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत रेश्माने याला “आयुष्याची नवीन सुरुवात” असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनपुढे अभिनेत्रीने इन्फिनिटी, लव्ह आणि नजरेचा इमोजी दिला आहे. संपूर्ण कलाविश्वातून रेश्मावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : नवज्योत बांदिवडेकरला ‘या’ मराठी सिनेमासाठी ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार

सोनाली पाटील, शिवानी सोनार, गौरी कुलकर्णी, ऋतुजा बागवे, सायली संजीव, मीनाक्षी राठोड, ऋजुता देशमुख, सिद्धार्थ बोडके, योगिता चव्हाण या कलाकारांनी अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट करत तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : टीव्हीवर प्रदर्शित होणार होता ‘आशिकी’ सिनेमा, गाणी हिट झाल्यावर बनवला चित्रपट, बजेट होतं फक्त ‘इतके’ लाख

दरम्यान, रेश्मा शिंदेचं हे दुसरं लग्न आहे. काही वर्षांपूर्वी ( २०१७ ) तिने घटस्फोट घेतला होता. यानंतर रेश्माने पूर्णवेळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केलं होतं. ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमुळे तिची लोकप्रियता वाढली. आता अभिनेत्रीने लग्नगाठ बांधत एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reshma shinde wedding share dreamy photos of marriage with husband sva 00