Reshma Shinde Haldi Ceremony : ‘नांदा सौख्यभरे’, ‘चाहूल’, ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधून अभिनेत्री रेश्मा शिंदे घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रेश्मा खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचं केळवण पार पडलं होतं. यानंतर आता रेश्माच्या घरी लग्नाआधीच्या विधींना आता सुरुवात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेश्मा शिंदेचा मेहंदी सोहळा बुधवारी रात्री पार पडला होता. यानंतर आज ( गुरुवार २८ नोव्हेंबर ) तिच्या हळदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अभिनेत्री उद्या ( २९ नोव्हेंबर ) लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या हातावरच्या मेहंदी डिझाइनमुळे रेश्माच्या लग्नाची तारीख सर्वांसमोर उघड झाली.

हेही वाचा : Reshma Shinde हळद लागली…! रेश्मा शिंदेचा दाक्षिणात्य लूक अन् होणाऱ्या नवऱ्याची पहिली झलक आली समोर, व्हिडीओ व्हायरल

रेश्मा शिंदेने शेअर केला होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील कलाकारांनी रेश्माचं घरगुती पद्धतीने पण, अतिशय सुंदररित्या केळवण केल्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी अभिनेत्री नेमकी कोणाशी लग्न करणार याबद्दल सर्वत्र प्रचंड चर्चा रंगल्या होत्या. अखेर हळदी समारंभाच्या फोटोंमुळे रेश्माच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा आता सर्वांसमोर उघड झाला आहे.

रेश्माने तिच्या पहिल्या केळवणात खास उखाणा घेतला होता. होणाऱ्या नवऱ्याची ओळख गुलदस्त्यात ठेवायची असल्याने तिने उखाणा घेतानाचा व्हिडीओ शेअर करताना खास त्याच्या नावाचा उल्लेख येतो, तेव्हा बीप वापरला होता. पण, यामध्ये रेश्माच्या लिप-सिंकवरून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव पवन असल्याची आधीच चर्चा झाली होती. यासंदर्भातील अनेक कमेंट्स देखील रेश्माच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. अखेर हळदीच्या फोटोंमध्ये होणाऱ्या नवऱ्याला टॅग करत रेश्माने त्याची ओळख रिव्हिल केली आहे. अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला टॅग करत कॅप्शनमध्ये ‘आमची हळद’ म्हटलं आहे. संबंधित अकाऊंटच्या बायोमध्ये तिच्या होणाऱ्या पतीचं नाव पवन असं लिहिलं आहे.

हेही वाचा : ३ तास २१ मिनिटं; ‘Pushpa 2’ ठरणार सर्वाधिक लांबीचा चित्रपट? ॲडव्हान्स बुकिंगची तारीख ठरली…; चित्रपटाचं बजेट किती?

हेही वाचा : माधुरी दीक्षितवर जडला जीव, मॅच फिक्सिंगमध्ये अडकला अन् तिने…; भारताच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची अधुरी प्रेमकहाणी

रेश्मा शिंदेचा होणारा नवरा ( Reshma Shinde Haldi Ceremony )

दरम्यान, रेश्मा शिंदेच्या ( Reshma Shinde ) हळदीच्या फोटोंवर मराठी कलाविश्वातील कलाकारांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. शरयू सोनावणे, पूजा बिरारी, अनघा अतुल या अभिनेत्रींनी तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reshma shinde wedding shares first photo with husband to be celebrate haldi ceremony photos viral sva 00