पडद्यावर दिसणारे कलाकार हे खऱ्या आयुष्यात एकमेकांबरोबर कसे राहत असतील, त्यांची खऱ्या आयुष्यात मैत्री असते का? एखादा चित्रपट, मालिका, नाटक संपल्यानंतर ते एकमेकांना भेटत असतील का? पडद्यामागे या कलाकारांमधील नाते कसे असते, याविषयी प्रेक्षकांना अनेकदा उत्सुकता असलेली दिसते. एखादी मालिका संपल्यानंतरही जेव्हा कलाकार एकत्र येतात, त्यावेळी चाहत्यांनादेखील आनंद झालेला दिसतो. आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी'(Satvya Mulichi Satvi Mulgi) ही मालिका संपल्यानंतर यातील काही कलाकार एकत्र आल्याचे एका रीलमध्ये पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिनेत्री तितीक्षा तावडे(Titeekshaa Tawde)ने सोशल मीडियावर एक रील शेअर केली आहे. यामध्ये तिच्याबरोबर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अमृता रावराणे असल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला या तीनही अभिनेत्रींनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यानंतर त्यांनी साडी नेसली असून तिघीही अत्यंत सुंदर दिसत आहेत. एकमेकींबरोबर त्या आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तितीक्षाने ‘रियुनियन’ असे लिहिले आहे. आता या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे.

नेटकरी काय म्हणाले?

अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करीत प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने, “तीन सुंदऱ्या”, असे लिहित हार्ट इमोजी शेअर केली आहे. दुसऱ्या नेटकऱ्याने, “तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहायचे आहे, उत्तम टीम”, असे म्हणत या कलाकारांचे कौतुक केले आहे. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “कमाल”, अनेकांनी अप्रतिम, सुंदर असे म्हणत हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकेत तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अमृता रावराणे या अभिनेत्री एकत्र काम करताना दिसल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने निरोप घेतला आहे. मालिकेदरम्यान या कलाकारांमध्ये घट्ट मैत्री झाल्याचे अनेक व्हिडीओंमधून पाहायला मिळाले. अनेकदा विनोदी रील, डान्स किंवा शूटिंगदरम्यानचे व्हिडीओ अशा विविध माध्यमांतून हे कलाकार चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत असत. आता मालिका संपल्यानंतर पहिल्यांदाच तीनही अभिनेत्री एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: आधी ख्रिसमसच्या शुभेच्छा, मग फ्लाइंग किस…; चिमुकली राहा कपूर नेमकं काय म्हणाली? तिचा गोड अंदाज पाहून सगळेच भारावले

आता हे सर्व कलाकार नवीन कोणत्या मालिकेतून किंवा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हे कलाकार पुन्हा एकदा एकत्र दिसणार का, याबद्दलही चाहत्यांच्या मनात उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.