‘सैराट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू होय. आर्ची या भूमिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. आजही तिची आर्ची ही ओळख कायम आहे. आता मात्र तिने एका मुलाखतीदरम्यान तिच्या वडिलांनी तिला घराबाहेर काढले होते, असे वक्तव्य केल्यामुळे सध्या ती चर्चांचा भाग बनली आहे.

रिंकू राजगुरूने नुकतीच ‘व्हायफळ’ या युट्यूब पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर वक्तव्य केले आहे. बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यावेळी तिने तिच्या वडिलांनी तिला घराबाहेर काढले होते, अशी आठवण सांगितली आहे.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी

काय म्हणाली रिंकू राजगुरू?

सायकलवरुन ती कुठे दुर गेली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना रिंकू म्हणते की, मी चौथी-पाचवीला असेन, मला आता आठवत नाही. पण मी सायकल चालवत माझ्या मैत्रीणीकडे गेले आणि तिथेच खेळत बसले. खेळता-खेळता मला कळालंच नाही. अंधार झाला होता. साडे सात वाजून गेले असणार, तेवढ्यात मला माझ्या वडिलांच्या गाडीचा आवाज आला. बाबा आले, मला म्हणाले कुणाला विचारुन आली होतीस. मी सॉरी म्हटलं. बाबा म्हणाले, लगेच घरी जायचं. मग मी रडत रडत सायकलवर पुढे आणि माझ्या पाठीमागे माझे बाबा, असे आम्ही घरी आलो.

बाबांनी गेट लावलं आणि म्हणाले, “मी तुला घरात घेणार नाही”. मी खूप रडले. पण त्यांनी काही मला घरात घेतलं नाही. मी बाहेर होते. शेजारच्या काकू म्हणाल्या, “काय झालं गं?” मी त्यांना सांगितलं, “मला घराच्या बाहेर काढलं.” त्या म्हणाल्या, “आमच्या घरी ये.” मी त्यांच्या घरी गेले, जेवण केलं, निवांत बसले. बाबा आले आणि म्हणाले, “चला घरी, जेवायचं आहे ना?” मी त्यांना म्हटलं, मी जेवले. पण घरी चला.”अशी आठवण रिंकूने या पॉडकास्टवेळी सांगितली आहे.

हेही वाचा: दिवंगत राजेश खन्नांना दिलेली ‘बिग बॉस’ची ऑफर, निर्माते एका एपिसोडसाठी देणार होते तब्बल ३.५ कोटी, पण…

शाळेची आठवण सांगताना रिंकू म्हणते, शाळेत एका बाईंच्या वर्गात मला बसायचं नाही म्हणून मी हट्ट करत होते. कारण त्या अभ्यास खूप द्यायच्या. मी वडिलांचा मार खाल्ला पण वर्ग बदलून घेतला अशी आठवणदेखील रिंकूने सांगितली आहे.

लहान असताना शाळेतून घरी जाताना ती कुत्र्या-मांजराची पिल्लं घेऊन घरी जायची आणि लपवून ठेवायची. त्यांची गब्बर, मोती, हिटलर अशी नावे असल्याची अशी आठवणदेखील तिने सांगितली आहे.

दरम्यान, रिंकू राजगुरूने ‘सैराट’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिने निभावलेल्या आर्चीच्या भूमिकेला चाहत्यांकडून मोठे प्रेम मिळाले होते. अभिनेत्री नुकतीच ‘झिम्मा २’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसली.