Bigg Boss Marathi 5 व्या पर्वाची विविध कारणांमुळे चर्चा रंगली आहे. रितेश देशमुखने या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतल्यावरून सर्वांत जास्त प्रमाणात चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. आता बिग बॉस ३ मध्ये सदस्य म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री गायत्री दातार हिने रितेश देशमुखच्या होस्टिंगबाबत एका मुलाखतीदरम्यान वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाली गायत्री दातार?

अभिनेत्री गायत्री दातारने अल्ट्रा बझ मराठीला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी तिने रितेश देशमुखच्या होस्टिंगबाबत बोलताना म्हटले, “रितेश आणि जेनेलिया मला फार आवडतात. ते सगळ्यांना मान देऊन बोलतात. खूप मृदू बोलतात. रितेश देशमुख जेव्हा सूत्रसंचालन करणार आहेत, असं जेव्हा मला कळलं तेव्हा मला असं वाटतं होतं की, हे बिग बॉसच्या घरातील सदस्यांना झापतील ना? पण जेव्हा पहिल्या आठवड्यातील भाऊचा धक्का बघितला आणि त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या भाऊच्या धक्क्याचे एपिसोड बघितले, तेव्हा वाटलं की, ते इतक्या कमाल प्रकारे शो कसे हाताळत आहेत.”

“समोरच्याची आणि स्वत:ची प्रतिष्ठा राखून ते सदस्यांना त्यांच्या चुका सांगतात. त्यांचा एक वेगळा मार्ग आहे. भाऊचा धक्का हा एपिसोड मला फार आवडतो. त्यांची बोलण्याची, ड्रेसिंगची जी स्टाईल आहे, एकंदरीत ती संपूर्ण स्टाईलच वेड लावून जाणारी आहे. त्यामुळे मला ते ‘लैय भारी’ होस्ट वाटतात. महाराष्ट्राला ते वेड लावतच आहेत, अजून ते वेड लावतील, असं वाटतंय. महेशसरांनी याआधीचे सगळे सीझन होस्ट केले आहेत. तेदेखील कमालच होस्ट होते आणि रितेश देशमुखदेखील कमालच होस्ट आहेत.”

हेही वाचा: सलमान खानचा व्हिडीओ पाहून चाहते झाले दु:खी; म्हणाले, “तुमच्या आवडत्या अभिनेत्याला…”

प्रेक्षक आणि इतर अनेक कलाकारांनीदेखील रितेश देशमुखच्या होस्टिंगचे कौतुक केले आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी केलेल्या चुकांबद्दल त्यांची कडक शब्दांत कानउघाडणी करतो. जे सदस्य चांगले खेळत आहेत, त्यांना शाबासकीची थाप देतो, हे पाहायला मिळाले आहे. आता या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर कोणत्या सदस्यांना त्यांच्या चुकीबद्दल रितेशची बोलणी ऐकावी लागणार आणि कोणता सदस्य शाबासकीची थाप मिळवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गायत्री दातारच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती सध्या कलर्स मराठीवरील ‘अबीर गुलाल’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.