बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलीया आणि रितेश देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या काही दिवसांपासून रितेश आणि जिनिलीया यांचा वेड या चित्रपटाची चांगली चर्चा सुरु होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमवला होता. नुकतंच रितेश देशमुखने त्याच्या सुखी संसाराचे गुपित सांगितले आहे.
रितेश आणि जिनिलीया हे दोघेही झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अभिनेता श्रेयस तळपदे हा रितेशला त्याच्या संसारबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे.
आणखी वाचा : “रितेशने मला…” जिनिलीया देशमुखने सांगितले सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्यामागचे खरं कारण
“सुखी संसाराचे रहस्य काय?” असा प्रश्न श्रेयस रितेशला विचारतो. त्यावर “माणसाने चूक आपलीच आहे हे लवकर कबूल केलं पाहिजे”, असे रितेश गंमतीत म्हणतो. त्यानंतर श्रेयस हा ‘रितेश देशमुख हे त्यांच्या पत्नीला घाबरतात’, असे ओरडताना दिसतो. त्यांचा हा व्हिडीओ झी मराठीने शेअर केला आहे. यात श्रेयस आणि रितेशची ऑनस्क्रीन सुरु असलेली मजामस्तीही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “आमचे नाते पक्के होणार होतं पण तेव्हाच…”, रितेश देशमुखने उघड केले गुपित
रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. त्यांना दोन मुलं असून रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.