Riteish Deshmukh : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून शोमध्ये भाऊचा धक्का पार पडलेला नाही. यंदाचा होस्ट रितेश देशमुख सदस्यांची शाळा भाऊच्या धक्क्यावर घ्यायचा. मात्र, शूटिंगनिमित्त सध्या रितेश परदेशात असल्याने त्याला सगल दोन आठवडे भाऊच्या धक्क्यावर उपस्थित राहता आलेलं नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश ( Riteish Deshmukh ) गैरहजर राहिल्यावर अनेकांनी त्याने शो सोडला की काय…असा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली होती. मात्र, रितेश देशमुख कामानिमित्त परदेशात असल्याने भाऊचा धक्का घेऊ शकणार नाही अशी अधिकृत घोषणा नुकतीच ‘बिग बॉस’कडून करण्यात आली. याशिवाय आता रितेश थेट ६ ऑक्टोबरला पार पडणाऱ्या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित राहील असंही बिग बॉसकडून सांगण्यात आलं. अशातच आता अभिनेत्याची पत्नी जिनिलीया देशमुखने रितेश व मुलांचा परदेशातील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : Video : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत घटस्थापनेच्या दिवशी दुर्गेश्वरीनं रचलं कारस्थान; प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “हाकलून द्या…”

सुंदर कॅप्शन देत जिनिलीयाने शेअर केला खास व्हिडीओ

रितेश ( Riteish Deshmukh ) व जिनिलीया यांना राहील व रियान अशी दोन मुलं आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रितेश आपल्या मुलांबरोबर परदेशात फेरफटका मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. रितेश व त्याच्या दोन्ही मुलांनी या व्हिडीओमध्ये निळ्या रंगाचं जॅकेट घातल्याचं पाहायला मिळत आहे. जिनिलीयाने या व्हिडीओला खास कॅप्शन दिलं आहे.

जिनिलीया लिहिते, “लाडक्या बाबाला २० दिवसांनी भेटल्यावर हे दोघंही आईला विसरून जातात. एवढ्या दिवसांनी बाबा भेटल्यावर आई फक्त फोटो आणि व्हिडीओ काढायला यांच्याबरोबर असते.” या व्हिडीओमुळे रितेश परदेशात असल्याने भाऊच्या धक्क्यावर गैरहजर राहिल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “त्या सीझनमध्ये एकाही मुलाला सोडलं नाहीस”, राखी सावंतने केली निक्कीची बोलती बंद; म्हणाली, “आय लव्ह यू बोलून…”

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/09/riteish.mp4

दरम्यान, रितेश देशमुख ( Riteish Deshmukh ) येत्या ६ ऑक्टोबरला पार पडणाऱ्या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. आता ‘बिग बॉस मराठी’चा विजेता म्हणून रितेश कोणाच्या नावाची घोषणा करणार हे ऐकण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत. याशिवाय रितेशच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच तो बहुचर्चित ‘हाऊसफुल ५’ चित्रपटात झळकणार आहे. तसेच अभिनेत्याचा ‘राजा शिवाजी’ हा मराठी चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh out india for shooting genelia shared beautiful video of father and kids sva 00