Riteish Deshmukh slams Jahnavi Killekar : बिग बॉस मराठीच्या ५ व्या पर्वातील दुसऱ्या आठवड्यात जान्हवी किल्लेकरने घरातील बऱ्याच सदस्यांशी वाद घातले. शुक्रवारच्या एपिसोडमध्ये तिने ज्येष्ठ अभिनेत्री यांच्याबद्दल भांडताना अपमानजनक वक्तव्ये केली. यावरून तिला ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश देशमुखने चांगलंच सुनावलं आहे. तुझ्या डोक्यातील हवा या शोमधून बाहेर काढेल, असं रितेश जान्हवीला म्हणाला.
कलर्स मराठीने इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रितेशने जान्हवी व वर्षा उसगांवकर यांच्या भांडणाचा उल्लेख केला आणि तिला खडे बोल सुनावले. “जान्हवी, ही जी डोक्यात हवा आहे ना तुमच्या ही बाकीच्यांना बाहेर काढेल की माहीत नाही, पण तुम्हाला नक्की काढेल. सतत इतरांची लायकी काढायची. कधीतरी आरशासमोर उभं राहायचं आणि विचारायचं की… तुम्ही वर्षाजींना काय म्हणालात? हे घाणेरडं तोंड मला दाखवू नका. तेव्हा वर्षाजी म्हणाल्या, ‘मला अभिनयासाठी शासनातर्फे तीन-तीन पुरस्कार मिळालेले आहेत.’ तेव्हा तुम्ही म्हणालात, ‘पश्चाताप होत असेल त्यांना की त्यांनी त्यांनी तुम्हाला हे अवॉर्ड्स दिले’. जान्हवी, जितके प्रोजेक्ट्स तुम्ही केले नसतील ना, तुम्ही काय जितके प्रोजेक्ट्स मीसुद्धा केले नसतील ना, तेवढे त्यांनी रिजेक्ट केलेले आहेत,” असं रितेश देशमुख म्हणाला.
बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं?
गार्डन परिसरातून जान्हवी वर्षा उसगांवकरांना म्हणाली, “इथे पोरं बसलीत म्हणून तुम्ही इथे येता” यावर वर्षा तिला सांगतात, “अगं पोरं काय म्हणतेस…मी माझ्या नवऱ्याबरोबर आनंदात आहे. हे किती गलिच्छ बोलणं आहे. ‘बिग बॉस’ तुमच्यापेक्षा मोठा आवाज या कळसूत्री बाहुलीचा आहे.”
जान्हवी पुढे म्हणते, “तुम्ही घाणेरडा अर्थ काढताय. ही घाणेरडी अॅक्टिंग माझ्यासमोर करू नका…हे घाणेरडं तोंड माझ्यासमोर दाखवूच नका ताई… ही फाल्तूची ओव्हरअॅक्टिंग नका करू… त्यांना आता पश्चाताप होत असेल यांना आपण पुरस्कार का दिले? कारण, बाहेर अनेक चांगले-चांगले अभिनेते आहेत. त्यांना पुरस्कार मिळाले नाहीत…पण, तुम्हाला दिलाय.”
Bigg Boss Marathi : Video: “तोंड शिवलं होतं का?” धनंजय आणि घनःश्याममध्ये पडली वादाची ठिणगी, नेटकरी म्हणाले, “कोल्हापुरी दणका…”
जान्हवीने पुरस्कारांचा विषय काढल्यावर अंकिता या भांडणात मध्यस्थी करत म्हणते, “आपण त्यांच्या अभिनयावर का जातोय? तुम्ही दोघी इतर काही बोला पण, हे नको बोलूस.” जान्हवी तरीही शांत बसत नाही… भांडण करताना पुढे म्हणते, “यांना बाहेर काढतील ना… मग दोन शब्द बोलले पाहिजे म्हणून हे चालूये.” वर्षा उसगांवकर फुटेजसाठी भांडण करत असल्याचा आरोप जान्हवीने त्यांच्यावर केला होता. यावरूनच आता ‘भाऊचा धक्का’ मध्ये रितेशने जान्हवीला सुनावलं.
© IE Online Media Services (P) Ltd