Aarya Slapped Nikki in Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा या आठवड्याचा भाऊचा धक्का चांगलाच गाजला. स्पर्धक आर्याने कॅप्टन्सी टास्कमध्ये रागात निक्की तांबोळीवर हात उचलला होता. त्यादिवशी बिग बॉसने तिला जेलमध्ये टाकलं आणि दुसऱ्या दिवशी भाऊचा धक्क्यावर तिला घरातून निष्कासित करण्यात आलं. त्याआधी होस्ट रितेश देशमुखने (Riteish Deshmukh on Aarya Nakki Fight) आर्या व निक्की यांच्यातील भांडणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

आपण निक्कीला कानाखाली मारली याची कबुली आर्याने दिली होती. इतर स्पर्धक जे तिथे होते त्यांनीही आर्याने निक्कीला मारल्याचं पाहिलं होतं, पण बाहेर प्रेक्षकांना ते दृश्य दाखवण्यात आलं नाही. दोघींची झटापट फक्त दाखवण्यात आली होती. प्रेक्षकांनी ते दृश्य पाहिलं नसल्याने खरंच आर्याला निक्कीने मारलंय का? असा प्रश्नही खूप जणांना पडला होता. तर आर्याने निक्कीला मारलं ते ऑनएअर का दाखवण्यात आलं नाही, त्यामागचं कारण रितेश देशमुखने सांगितलं आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?

Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”

रितेशने सांगितला घटनाक्रम

रितेश देशमुख म्हणाला, “निक्कीने जे तुमच्याबरोबर केलं, ते आधी पॅडी आणि अंकिताबरोबर केलं. पण त्यांनी परिस्थिती नीट हाताळली. मग निक्कीला वाटलं की आपण इथे काहीच करू शकत नाही, त्या तिथून निघून गेल्या. त्या तुमच्याकडे आल्यावर तुम्ही फिजीकल झालात. जेव्हा बाथरुममध्ये निक्की आल्या, तुम्हाला त्यांना आत येऊ द्यायचं नव्हतं, या धक्काबुक्कीत तुम्हाला निक्कीचा हात लागला. त्यानंतर तुमचा संयम सुटला आणि तुम्ही काय म्हणालात, “निक्की मी तुला मारेन” आणि त्यानंतर तुम्ही निक्कीवर हात उचलला. आर्या तुम्ही स्वतःला काय समजता? म्हणजे तुम्हाला राग आला तर तुम्ही कोणावरही हात उचलणार? स्वतःवर नियंत्रण नाही? हे बिग बॉसचं घर आहे. या घरात खेचाखेची, धक्काबुक्की सगळ्या सिच्युएशन आल्यात, पण कोणीही स्वतःवरचा ताबा सोडला नाही. कोणीही कोणावर हात उचलला नाही.”

निक्कीला मारणं पडलं महागात, रितेशने सुनावलं अन् आर्याला बिग बॉसने दाखवला बाहेरचा रस्ता; म्हणाले, “अशा निंदनीय कृत्यांना…”

पुढे रितेश म्हणाला, “तुम्ही निक्कीवर हात उचलला आणि एवढ्यावरच थांबला नाहीत तर तुम्हाला वाटलं की फार मोठा पराक्रम मी केलाय, त्यावर तुम्ही हसत होतात. तुम्ही तुमच्या चुकीचं समर्थन करत होता. तुम्हाला ही चूक वाटतच नव्हती, या गोष्टीचा मला जास्त राग आला. हात उचलणं ही प्रतिक्रिया नव्हती, ठरवलंच होतं. कारण त्याआधी तुम्ही मी मारेन असं वॉर्न केलं होतं. त्यानंतर तुम्ही हात उचलला. थोडक्यात, तुम्ही जे केलं ते १०० जाणीवपूर्वक केलंत. आर्या तुम्ही कलाकार आहात, तुमचे चाहते आहेत, याशोमुळे चाहते वाढलेही असतील. तुम्हाला चाहत्यांसमोर हा आदर्श ठेवायचाय? की राग आला तर मी मारेन, संयम सुटला तर मी काहीही करू शकते. या रागानेच तुमचा घात केला. आपण जे करतो त्याचं समाजात अनुकरण केलं जातं, त्यामुळे कलाकार म्हणून आपली जबाबदारी असते. ही जबाबदारी पार पाडण्यात तुम्ही अपयशी ठरलात.”

“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”

आर्या स्वतःची बाजू मांडताना काय म्हणाली?

“माझ्याकडून चूक झाली, जेलमध्ये राहणं जेवढी मोठी शिक्षा आहे, त्यापेक्षा मोठी शिक्षा माझा राग आहे. आजवर मी कोणावर हात उचलला नव्हता, त्यामुळे मीही विचार करतेय की माझ्याकडून हे घडलंच कसं? जेव्हा सगळ्यांना वाटलं की मी हसतेय तेव्हा माझी लाज रागासमोर कमी पडली. नंतर मला जाणीव झाली. ती जे करते, तसं मी केल्याने मला मीच सर्वात मोठी गुन्हेगार वाटतेय. माझी चूक आहे, हिंसा चुकीचीच असते. मी निक्की आणि बिग बॉस दोघांचीही माफी मागते. प्रेक्षकांचाही मी माफी मागते,” असं आर्या म्हणाली.

यानंतर रितेशने बिग बॉसला निर्णय सांगण्याची विनंती केली आणि मग बिग बॉसने आर्याला घरातून निष्कासित केलं.

आर्याने निक्कीला मारलं ते प्रेक्षकांना का दाखवलं नाही?

“जी घटना घडली ती आपण टीव्हीवर दाखवू शकत नाही, कारण घरात जी हिंसा होते ती आपण प्राइम टाइमवर दाखवू शकत नाही. लहान मुलंसुद्धा हा शो पाहतात. जे काही यावर निर्णय घेतलेले आहेत ते बिग बॉसची टीम, बिग बॉस, मी आम्ही सर्वांनी त्या क्लिप्स पाहिलेल्या आहेत. त्यानंतरच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला,” असं रितेशने सांगितलं.

Story img Loader