Riteish Deshmukh : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनदरम्यान सगळ्या सदस्यांबरोबर आणखी एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे रितेश देशमुख. भाऊच्या धक्का खऱ्या अर्थाने रितेशने गाजवला. मध्यंतरी दोन आठवडे अभिनेता भाऊच्या धक्क्यावर गैरहजर होता यामुळे प्रेक्षक देखील नाराज झाले होते. मात्र, परदेशात शूटिंग असल्याने उपस्थित राहता आलं नाही असं स्पष्टीकरण देत रितेशने ग्रँड फिनालेला सर्व प्रेक्षकांची माफी मागितली होती. यंदाच्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला. त्याच्याबरोबर सेल्फी फोटो शेअर करून अभिनेता पुन्हा एकदा लंडनसाठी रवाना झाला.

रितेशने ( Riteish Deshmukh ) ‘बिग बॉस’ फिनाले पार पडल्यावर पुन्हा एकदा परदेशी रवाना झाला. सध्या ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीम लंडनमध्ये आहे. रितेश सुद्धा या बिग बजेट सिनेमाचा भाग असल्याने त्याला Bigg Boss संपल्यावर परदेशात जावं लागलं. परिणामी, आज तो त्याच्या आईच्या वाढदिवसाला सुद्धा उपस्थित नाहीये. मात्र, एक सुंदर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने आपल्या आईसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा

हेही वाचा : Bigg Boss 18 : पहिल्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया ‘अशी’ पार पडली, गुणरत्न सदावर्तेंसह ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट

रितेश देशमुखने शेअर केला सुंदर व्हिडीओ

रितेशचे दोन्ही भाऊ अमित व धीरज देशमुख राजकारणात सक्रिय आहेत. आज वैशाली देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याचे दोन्ही भाऊ आईचं औक्षण करून त्यांचे आशीर्वाद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. रितेशने या व्हिडीओला ‘माऊली’ हे गाणं जोडून “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई! आय लव्ह यू” असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, रितेश देशमुखने ( Riteish Deshmukh ) शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह बॉलीवूड कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिषेक बच्चन, मुश्ताक शेख, रवी जाधव, बॉबी देओल, राज कुंद्रा या सगळ्या सेलिब्रिटींनी कमेंट्मध्ये वैशाली यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Riteish Deshmukh
रितेश देशमुख ( Riteish Deshmukh )

हेही वाचा : आधी वडिलांचा विश्वास नव्हता अन् आता…; धनंजयसाठी विजयी मिरवणूक! कोल्हापूरात पोहोचल्यावर घेतलं जोतिबाचं दर्शन

तर, रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओवर “ही खरी आमच्या लातूरची संस्कृती आहे”, “वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा आईसाहेब”, “भाऊ तुम्ही कुठे आहात आईच्या वाढदिवशी”, “सुंदर व्हिडीओ” अशा असंख्य प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी देशमुख कुटुंबीयांचं कौतुक केलं आहे.

Story img Loader