‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) च्या पाचव्या पर्वाला सुरुवात होऊन आता दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. आता दुसऱ्या आठवड्याच्या ‘भाऊच्या धक्क्या’ची चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश देशमुखने ‘भाऊचा धक्का’ या एपिसोडमध्ये जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, वैभव चव्हाण यांची त्यांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल कठोर शब्दांत कानउघाडणी केल्याचे पाहायला मिळाले. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये बिग बॉसच्या स्पर्धकांना एक टास्क दिला असून एका सदस्याने दुसऱ्या सदस्याला टॅग देण्याचा हा टास्क आहे. आता अंकिताने जान्हवीला दिलेल्या टॅगची मोठी चर्चा होताना दिसत आहे.

काय म्हणाला रितेश देशमुख?

आता घराची पहिली कॅप्टन अंकिता प्रभू वालावलकर हिने हॅशटॅग ‘मौंजुलिका; हा टॅग जान्हवीला दिला आहे. तिने हा टॅग देताना म्हटले, “मी
मौंजुलिका हा हॅशटॅग जान्हवीला देते, कारण ती कधीतरी फारच रागात असते आणि कधीतरी वर्षाजींचे पाय दाबताना दिसते. आम्हाला कळतच नाही की, खरी जान्हवी कोणती आहे, म्हणून मी तिला हा हॅशटॅग मौंजुलिका देऊ इच्छिते.” अंकिताने जान्हवी वर्षाजींचे पाय दाबते असे म्हटल्यानंतर रितेश देशमुख आश्चर्य व्यक्त करत विचारतो, जान्हवी वर्षाजींचे पाय दाबते? त्यावर अंकिता होय, कालच तिने त्यांचे तेल लावून पाय दाबले होते असे सांगते. त्यावर रितेश, हा प्रवास खरंच चांगला असून गळ्यापासून पायापर्यंत आलेला आहे.” असे म्हणताना दिसतो. त्यानंतर ‘मेरे ढोलना सुन’ या गाण्यावर अंकिता आणि जान्हवी या डान्स करताना दिसत आहेत.

रितेश देशमुखच्या ‘भाऊच्या धक्का’ या एपिसोडमध्ये ‘खेल खेल में’ या चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. अक्षय कुमार, फरदीन खान, वाणी कपूर, तापसी पन्नू, आदित्य सील, एमी विर्क हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा: भाऊच्या धक्क्यावर अक्षय कुमारची एन्ट्री! ‘झापुक झुपूक…’ म्हणत सूरजसह धरला ठेका, तर वर्षा उसगांवकरांना म्हणाला…

दरम्यान, आता पाचव्या पर्वात १६ स्पर्धक सहभागी झाले होते. पहिल्या आठवड्यात कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांनी घराला निरोप दिला. आता दुसऱ्य़ा आठवड्यात योगिता चव्हाण, घन:श्याम दरवडे, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण हे स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. आता दुसऱ्या आठवड्यात कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ‘भाऊचा धक्का’ या आजच्या एपिसोडमध्ये आणखी काय धमाल पाहायला मिळणार, हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरणार असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh surprised heard of janhvi killekar did good things for varsha usgaonkar bigg boss marathi 5 promo nsp