रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख बॉलिवूडमध्ये ही मराठमोळी जोडी खूपच प्रसिद्ध आहे. या जोडीचे अनेक चाहते आहेत. नुकताच दोघांचा वेड चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते कपिल शर्माच्या शोमध्ये गेले होते. तिथे रितेशने जिनिलीयाबद्दल वक्तव्य केलं आहे.
रितेश-जिनिलीया वेड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी हे दोघे ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये गेले होते. तिथे कपिलने काही मजेशीर प्रश्न विचारले, त्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन झाले. कपिलने रितेशला विचारले की, तु”म्ही दोघे कायम एकत्र असता, सोशल मीडियावर एकत्र रील बनवता, एकत्र चित्रपट करता तर रितेश तुमच्यात प्रेम जास्त आहे की तू जिनिलीयाला घाबरतोस का?” यावर रितेश म्हणाला, “कपिल तू काहीही बोलतोस पण मी जिनिलीयाला खूप घाबरतो.” रितेशच्या या उत्तरावर सगळेच खळखळून हसले.
“पॉवर रेंजर्स की अँटमॅन?” बॉलिवूडच्या पार्टीत हॅल्मेट घालून येताच राज कुंद्रा ट्रोल
रितेश व जिनिलीयाच्या लग्नाचा आज अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. यांना दोन मुलं आहेत. त्यांनी त्यांच्या मुलांवर उत्तम संस्कार केले आहेत. अनेकदा मुलांबरोबरचे फोटो व व्हिडीओही ते शेअर करताना दिसतात.
‘वेड’ चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तर जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे.