अभिनेता किथ सिक्वेरा आणि अभिनेत्री रोशेल राव लवकरच आई-बाबा होणार आहेत. बुधवारी या दोघांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ते त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यास तयार असल्याचं त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सागितलं. दोघांनी चाहत्यांना गुड न्यूज देताना समुद्रकिनाऱ्यावर काढलेले सुंदर फोटोही शेअर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुभव: लग्नासाठी मुलगा शोधताना…

फोटोशूटमध्ये रोशेलने फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे, तर किथनेही मॅचिंग शर्ट आणि पांढरी पँट घातली आहे. पहिल्या फोटोत तो रोशेलच्या बेबी बंपवर कान ठेऊन समुद्राजवळ पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये किथ पत्नी रोशेलच्या कपाळावर किस करताना दिसत आहे.

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अंजीला वाढदिवशी बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो पोस्ट केले आणि त्याला कॅप्शन दिले, “दोन लहान हात, दोन लहान पाय, एक लहान मुलगा किंवा मुलगी ज्याला भेटण्यासाठी आम्ही वाट पाहू शकत नाही! होय, तुमचा अंदाज बरोबर आहे, आम्ही पालक होणार आहोत! या अविश्वसनीय भेटीसाठी प्रभू येशूंचे आणि तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी तुम्हा सर्वांचे आभार. या नवीन प्रवासात आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमच्यासाठी प्रार्थना करत राहा”.

ही आनंदाची बातमी दिल्यानंतर किथ व रोशेलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. किथ सिक्वेरा आणि रोशेल राव यांनी २०१८ मध्ये तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये एका खासगी समारंभात लग्न केले होते. त्यापर्वी काही वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. त्यांनी एकत्र २०१५ मध्ये ‘बिग बॉस ९’ आणि २०१९ मध्ये ‘नच बलिए’मध्ये भाग घेतला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rochelle rao keith sequeira announces pregnancy shares baby bump photoshoot pictures hrc