‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाचं पहिलं पर्व खूपच गाजलं होतं. या कार्यक्रमातील पंचरत्नांना श्रोत्यांच विशेष प्रेम मिळालं होतं. त्यावेळी या पंचरत्नांच्या गाण्याच्या कॅसेट मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या होत्या. अजूनही हे पंचरत्न आपल्या दमदार आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. सध्या या पंचरत्नांपैकी एक म्हणजेच रोहित राऊतचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस पडला आहे. रोहितच्या आवाजाच कौतुक होतं आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षपूर्तीनिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रसिद्ध मराठमोळी संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा लाइव्ह कॉन्सर्ट होता. या कान्सर्टमध्ये रोहित राऊतने जबरदस्त परफॉर्मन्स केला; ज्याचं सध्या कलाकार मंडळींसह चाहते कौतुक करत आहेत.

lakhat ek amcha dada fame isha sanjay and juee tanpure dance on uyi amma
Video : सूर्या दादाच्या बहि‍णींचा जबरदस्त डान्स! सुपरहिट ‘उई अम्मा’ गाण्यावर थिरकल्या, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
litile girl Singing
चिमुकलीने गायले “मेरे ख्वाबों में जो आए” गाणे! नेटकरी म्हणे, ‘हा तिचा आवाज नाही”, Viral Videoचे काय आहे सत्य?
lavani dance
“बारक्याने मार्केट गाजवलंय!”, ‘कारभारी दमानं..!’ गाण्यावर चिमुकल्याची ठसकेबाज लावणी! गौतमी पाटीलला देखील टाकले मागे
Mother daughter amazing duo did an amazing dance on the Koli song Video viral
“तो चक चक सोन्याचा…”; माय-लेकीची भन्नाट जोडी, कोळी गीतावर केले अफलातून नृत्य! Video पाहून सांगा, कोणी मारली बाजी?
aishwarya and avinash narkar dances on tamil song
Video : ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा तामिळ गाण्यावर रोमँटिक अंदाज! नेटकरी म्हणाले, “एव्हरग्रीन जोडी…”
Rohit Sharma Dance Step on Wankhede Stadium Stage to Call Shreyas Iyer to Join Him Video Goes Viral
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा ब्रेकडान्स, श्रेयस अय्यरला स्टेजवर बोलवण्यासाठी केली हटके डान्स स्टेप, वानखेडेच्या कार्यक्रमातील VIDEO व्हायरल
Rohit Sharma Champions Trophy Gesture for Sunil Gavaskar Ravi Shastri Wins Heart at Wankhede Stadium Ceremony Video Viral
VIDEO: रोहित शर्माच्या कृतीने वानखेडेवर जिंकली सर्वांची मनं, चॅम्पियन्स ट्रॉफी करंडकाबरोबर फोटो काढताना पाहा काय घडलं?

हेही वाचा – “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तून बाहेर पडले याचा अर्थ…”, विशाखा सुभेदारच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

या परफॉर्मन्सचा व्हिडीओ स्वतः रोहित राऊतने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत रोहित ‘अग्निपथ’ या चित्रपटातील अजय-अतुलचं गाणं ‘ओ सैयाँ’ गाताना दिसत आहे. त्याचा सुमधूर व दमदार आवाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रोहित राऊतच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वानंदी टिकेकरने लिहिलं आहे, “क्या बात है रोह्या, लव्ह यू.” तर सिद्धार्थ चांदेकरने लिहिलं आहे, “रॉकस्टार.” तसेच जयवंत वाडकरांनी लिहिलं, “कमाल.”

याशिवाय एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “हे गाणं ऐकल्यावर थेट काळजाला भिडतं आणि तू तर अप्रतिम गातोस, अप्रतिम गायलं आहेस. माझ्या मते सोनू निगमनंतर तूच अशी हृदयस्पर्शी गाणी गाऊ शकतोस, यात शंका नाही.” तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “माझ्या भावा गाणं कडक गायलंस.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “क्रिकेटमध्ये रोहित शर्मा अन् आवाजात रोहित राऊत नाद म्हणजे तोड नाही यांना.”

हेही वाचा – मुग्धा वैशंपायनचा पहिला गुढीपाडवा, तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छा देत विचारलं, “प्रथमेशकडून काय गिफ्ट मिळालं?”

दरम्यान, अलीकडे रोहित राऊतने गायलेलं ‘नखरेवाली’ हे गाणं अजूनही ट्रेंड होतं आहे. या गाण्याला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader