‘खतरों के खिलाडी १३’ हा सध्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. या शोची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. या पर्वात सहभागी झालेले स्पर्धक दर आठवड्यात वेगवेगळे टास्क आणि स्टंट करताना दिसतात. या शोमधील काही अपडेट्स कलर्स टीव्ही इन्स्टाग्रामवरून शेअर करण्यात येतात. याच्या पुढच्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अर्चना गौतमला शोमधून बाहेर काढण्यात येतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चांद्रयान-३ ची खिल्ली उडवल्याने नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; प्रकाश राज दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले, “तुम्हाला विनोद समजला…”

रुही चतुर्वेदी आणि डेजी शाहसह काही स्पर्धक ‘खतरों के खिलाडी १३’ मधून बाहेर पडले आहेत. त्यानंतर आता असं दिसतंय की अर्चना गौतमलाही रोहित शेट्टीच्या शोमधून बाहेर काढलं जाणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार, अर्चनावर शोच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होतो, त्यानंतर रोहित शेट्टी तिला शोमधून बाहेर जाण्यास सांगत आहे.

“ड्रग्ज दिले, न्यूड व्हिडीओ काढला”, आदिल खानच्या आरोपांवर राखी सावंतची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “या माणसाचा…”

कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रोहित शेट्टी म्हणतो, “एक दुर्दैवी घटना घडली आहे. नियमांनुसार तू शोमध्ये राहू शकत नाही.” प्रोमोमध्ये एक क्रू मेंबर अर्चनावर जबरदस्तीने किस केल्याचा आरोप करताना दिसतो. ज्यावर अर्चना रडते आणि म्हणते, “तो खोटं बोलतोय आणि मला फसवतोय. त्यानेच मला किस करण्यास सांगितलं, मी नाही म्हटलं होतं.” त्यानंतर रोहित शेट्टी म्हणतो की अर्चना यापुढे शोचा भाग राहू शकत नाही. यानंतर अर्चना शोच्या सेटवरून रडत निघताना दिसली.

दरम्यान, प्रोमो पाहिल्यावर अर्चना ‘खतरों के खिलाडी १३’ मधून आउट होईल, असं दिसतंय. पण हे खरंच होणार आहे की शोचा होस्ट रोहित शेट्टीने अर्चनाबरोबर मस्करी केली आहे, हे आगामी एपिसोडमध्येच कळेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit shetty asks archana gautam to leave show as she tried to kiss crew member of khatron ke khiladi 13 see video hrc