बिग बॉसमध्ये वाद, रुसवे-फुगवे, प्रेमप्रकरण अशा गोष्टी कायमच चर्चेत असतात. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची चर्चा आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या स्पर्धेत टॉपमध्ये असल्याचे पाहायला मिळतो. नुकतंच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून डॉ. रोहित शिंदे हा बाहेर पडला. यानंतर त्याने रुचिराने केलेल्या अनेक आरोपांबद्दल स्पष्टीकरण दिले. यावेळी त्याने रुचिराने त्याला अनफॉलो करण्याबद्दल उत्तर दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीला गोडीगुलाबीने वावरणाऱ्या रोहित-रुचिरा या जोडीमध्ये हळूहळू मतभेद व्हायला लागला. त्यानंतर त्याच आठवड्यात रुचिराही बिग बॉसच्या घराबाहेर पडली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिने रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले होते. यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. अखेर आता रोहितने भाष्य केले आहे. रोहित शिंदेने नुकतंच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने याबद्दल सविस्तर उत्तर दिले.
आणखी वाचा : “मला लाखो रुपये दिले तरीही…” रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रुचिरा जाधव स्पष्टच बोलली

रोहित शिंदे काय म्हणाला?

“अनफॉलो फॉलो हे तितकं महत्त्वाचं आहे असं मला वाटत नाही. जरी तिने मला अनफॉलो केलं असेल तर तिने तिच्या जीवनातून एखाद्या माणसाला अनफॉलो केलं असं होत नाही. अनफॉलो करण्याचे कारण कदाचित एखादा ताण वैगरे असू शकतो.

कारण अनेकदा त्याच त्याच गोष्टी सारख्या सारख्या समोर येत असतात. आपण हल्ली इन्स्टाग्राम सर्वात जास्त पाहतो. इन्स्टाग्रामवर सतत तेच तेच येणं, माझ्याबद्दल पोस्ट येत असतील ज्यामुळे तिला त्रास झाला असेल. कदाचित तिला कुठेतरी शांतता हवी असेल, म्हणून तिने ते केलं असावं. तिच्याजागी जर मी असतो तर कदाचित मी देखील हेच केलं असतं. अनफॉलोचे रुपांतर फॉलोमध्ये करायला जास्त वेळ लागत नाही. ते प्रेम आहे. त्यामुळे लवकरच सर्व गोष्टी सुरळीत होतील.” असे रोहित शिंदे म्हणाला.

आणखी वाचा : Photos: मराठी कलाकारांच्या मंगळसूत्रांच्या हटके स्टाइल, डिझाईन पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

दरम्यान बिग बॉसच्या यंदाच्या पर्वामध्ये रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे हे रिअल लाईफ कपल सहभागी झाले होते. मात्र बिग बॉस मराठीच्या घरात रोहित आणि रुचिराचे मतभेद झाले. त्यांच्यात वाद देखील झाला. अशातच रुचिरा नॉमिनेट झाल्याने त्यांच्यामधला वाद आणखी चिघळला. कार्यक्रमामधून बाहेर पडल्यानंतर तिने रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले. यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या.