‘नवरी मिळे हिटलरला'(Navari Mile Hitlarla) या मालिकेत सतत नवीन गोष्टी घडताना दिसतात. कधी लीला तिच्या सुनांना सासूचा रूबाब दाखवताना दिसते. तर कधी सूना तिला घराबाहेर काढण्यासाठी कट कारस्थान करताना दिसतात. एकीकडे आजी लीलाचे लाड करते, तिला समजून घेते तर दुसरीकडे एजेला लीला बेशिस्त, अल्लड वाटते. लीला बऱ्याचदा एजेविषयी प्रेम व्यक्त करते मात्र वेळ आलीच तर त्याच्याविरूद्धही जाते. आता नवरी मिळे हिटलरला मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली पाहायला मिळत आहे.
लीला व एजेमधील जवळीकता वाढणार…
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरूवातीला लीला एजेला दूध आणून देते व त्याला सांगते, “आता छान गरम दूध प्यायचं. तिथे रूमालावर नीलगिरीसुद्धा लावून ठेवलीय मी आणि थर्मासमध्ये गरम पाणीसुद्धा आहे.” तिचे हे बोलणे ऐकून एजे तिला म्हणतो, “तू हे सगळं का करत आहेस?” लीला म्हणते, का म्हणजे काय? माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. त्यावर एजे तिला म्हणतो, “तुला काय वाटतं फक्त तुझंच माझ्यावर प्रेम आहे?”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “एजेही लीलाच्या प्रेमात…?”, अशी कॅप्शन दिली आहे.
काय म्हणाले नेटकरी?
आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “लीलाच्या स्वप्नांची गाडी एक्सप्रेस मोडवर आहे”, “लीला पुन्हा स्वप्न पाहत आहे. कसं होईल या लीलाचं”, असे म्हणत हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “स्वप्न, स्वप्न आणि स्वप्न” आणि एका नेटकऱ्याने लिहिले, “लीलाचे क्यूट व रोमँटिक स्वप्न काही संपत नाहीत. त्यामुळे आमच्या सुद्धा अपेक्षा वाढतात.”
हेही वाचा: शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत लीलाने एजेवरचे तिचे प्रेम व्यक्त केले आहे. मात्र एजेने त्याचे फक्त अंतरावरच प्रेम असल्याचे तिला स्पष्ट सांगितले आहे. आता लीला अनेकदा एजे तिच्या प्रेमात पडला आहे, अशी स्वप्ने पाहताना दिसते. आता प्रोमोमध्ये दाखवलेले सत्य आहे की स्वप्न हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.