काही दिवसांपूर्वी स्वतःच्या पत्नीशी गोव्यात दुसरं लग्न करणाऱ्या अभिनेत्याची लेक शिक्षणासाठी परदेशात गेली आहे. अभिनेता, त्याची पत्नी व आई लाडक्या लेकीला मुंबई विमानतळावर सोडायला आले होते. यावेळी मुलीसह आलेले सर्वजण भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. आम्ही टीव्ही अभिनेता रोनित रॉयबद्दल बोलत आहोत.
रोनित रॉयच्या मुलीचे नाव आडोर रॉय आहे. ती १८ वर्षांची आहे. आडोर तिच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली आहे. यावेळी तिला विमानतळावर सोडायला रोनित रॉय, त्याची पत्नी नीलम, मुलगा अगस्त्य व त्याची आई हे चारजण आले होते. आडोरला परदेशात जाण्यासाठी निरोप देताना या सर्वांच्या डोळ्यांत पाणी आलं. ‘फिल्मीग्यान’ या पापाराझी अकाउंटवरून या कुटुंबाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
आडोर सर्वांना मिठी मारून भेटली आणि भावुक झाली. दरम्यान, आडोर ही रोनित व नीलम यांची मोठी मुलगी आहे. त्यांना अगस्त्य नावाचा लहान मुलगा आहे. काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या २० व्या वाढदिवसानिमित्त रोनित व नीलमने गोव्यात पुन्हा एकमेकांशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला आई व त्यांचा मुलगाही हजर होते.