छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलैक सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. शनिवारी (१० जून) रुबीनाबरोबर एक विचित्र घटना घडली. तिचा कार अपघात झाला. याबाबत रुबीनाचा पती अभिनेता अभिनव शुक्लाने ट्वीट करत माहिती दिली. त्याचबरोबरीने अभिनवने कारचे फोटोही सोशल मीडियाद्वारे शेअर केले. या अपघातामध्ये रुबीनाला कोणतीच दुखापत झाली नाही, मात्र या घटनेचा तिला धक्का बसला असल्याचं अभिनवने सांगितलं. आता रुबीनाने यावर भाष्य केलं आहे.
रुबीनाने ट्वीट करत घडलेल्या प्रकाराबाबत भाष्य केलं. तसेच तिची प्रकृती कशी आहे हेही तिने सांगितलं. अभिनवने शेअर केलेली पोस्ट रिट्वीट करत रुबीना म्हणाली, “पाठ व डोक्याच्या खालच्या बाजूला मला दुखापत झाली. सध्या तरी मी या धक्क्यामधून सावरली नाही. काही वैद्यकीय टेस्ट केल्या आहेत. आता सर्वकाही ठिक आहे”. शिवाय या अपघाताची माहितीही रुबीनाने दिली.

आणखी वाचा – “नाटक, मराठी मालिकांमधून मला काढून टाकलं अन्…”, संकर्षण कऱ्हाडेचा मोठा खुलासा, म्हणाला, “मी त्यावेळी रडलो कारण…”

Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
urmila kothare first post after car accident
“रात्री १२.४५ च्या सुमारास माझ्या गाडीचा…”, अपघातानंतर उर्मिला कोठारेची पहिली पोस्ट; सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”
Bollywood actress Mouni Roy falla down after celebrating New Year with husband Suraj Nambiar video viral
Video: न्यू इअरच्या पार्टीतून बाहेर येताच अभिनेत्री जोरात पडली, पतीने सावरत नेऊन बसवलं गाडीत, व्हिडीओ होतोय व्हायरल

ती म्हणाली, “निष्काळजी ट्रकचालकावर कारवाई करण्यात आली आहे. पण नुकसान झालं आहे. तुमच्या व आमच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांच्या नियमांचे पालन करा”. रुबीनाने ट्वीटच्या माध्मातून सगळ्यांना ड्रायव्हिंग करताना नियमांचे पालन करण्याची विनंती केली आहे. पण सध्या तरी या घटनेमधून ती सावरली नाही. चाहतेही तिच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

आणखी वाचा – ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने चालवली होती बस, पहिल्यांदाच ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबाबत म्हणाला, “रात्री दोन वाजेपर्यंत…”

अभिनवने ट्वीट केल्यानंतर रुबीनाचे चाहते चिंतेत होते. पण आता तिची प्रकृती एकदम ठिक आहे. ‘खतरोंके खिलाडी १२’, ‘झलक दिखला जा १०’, ‘बिग बॉस’ सारख्या शोमध्ये रुबीनाने सहभाग घेतला होता. तसेच हिदी मालिकांमध्ये तिने साकारलेल्या भूमिकाही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणाऱ्या आहेत.

Story img Loader