छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलैक सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. शनिवारी (१० जून) रुबीनाबरोबर एक विचित्र घटना घडली. तिचा कार अपघात झाला. याबाबत रुबीनाचा पती अभिनेता अभिनव शुक्लाने ट्वीट करत माहिती दिली. त्याचबरोबरीने अभिनवने कारचे फोटोही सोशल मीडियाद्वारे शेअर केले. या अपघातामध्ये रुबीनाला कोणतीच दुखापत झाली नाही, मात्र या घटनेचा तिला धक्का बसला असल्याचं अभिनवने सांगितलं. आता रुबीनाने यावर भाष्य केलं आहे.
रुबीनाने ट्वीट करत घडलेल्या प्रकाराबाबत भाष्य केलं. तसेच तिची प्रकृती कशी आहे हेही तिने सांगितलं. अभिनवने शेअर केलेली पोस्ट रिट्वीट करत रुबीना म्हणाली, “पाठ व डोक्याच्या खालच्या बाजूला मला दुखापत झाली. सध्या तरी मी या धक्क्यामधून सावरली नाही. काही वैद्यकीय टेस्ट केल्या आहेत. आता सर्वकाही ठिक आहे”. शिवाय या अपघाताची माहितीही रुबीनाने दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा