अभिनेत्री रुबिना दिलैक ही नेहमी तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. रुबिनाने २०१८ साली अभिनव शुक्लाबरोबर लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. हे कपल कधी गुड न्यूज देणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. नुकतचं रुबिनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरुन ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
रुबिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अभिनवबरोबर काही फोटो पोस्ट केले आहेत. यातील पहिल्या फोटोमध्ये दोघे गणपतीच्या पाया पडताना दिसत आहेत. रुबिनाने फोटो शेअर करत लिहिलं आहे “सगळ्या खूप खूप धन्यवाद… अभिनव तू दरवर्षी माझ्यासाठी खास आणि खूप खास करतोस.. काय कसेलिब्रेशन, काय सरप्राईज आणि काय ते प्लॅनिंग.”
हेही वाचा- फोटोतील ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? प्रसिद्ध मराठी मालिकांमध्ये साकारते महत्त्वाच्या भूमिका
या फोटोमध्ये रुबिनाने गुलाबी रंगाचा चिकन वर्क केलेली कुर्ती घातली आहे. या फोटोमध्ये रुबिना गरोदर असल्याची चर्चा रंगली आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं पहिल्या फोटोमध्ये बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. लोकांपासून का लपवत आहेस? तर आणखी एका लिहिलं आहे. प्रेगन्सीसाठी अभिनंदन, बाळ येणार आहे भाईलोग, चिमुकली पावलांचे आगमन होणार आहे, ती गरोदर आहे ८ महिन्यांनी आपल्याला कळेलच.’ अशा कमेंट केल्या आहेत.
यापूर्वीही अनेकदा रुबिनाने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओवरुन ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवासांपूर्वी रुबिनाने असाच एक व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडीओ बघून चाहत्यांमध्ये ती गरोदर असल्याची चर्चा रंगली होती. तसेच अनेकांनी तिचे अभिनंदनही केलं होतं.