Marathi Actress Rupali Bhosale : आपल्याकडे हक्काची गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी नव्याकोऱ्या गाड्या घेतल्याचं पाहायला मिळालं. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली संजना म्हणजे सर्वांची लाडकी रुपाली भोसलेने नुकतीच आलिशान मर्सिडीज कार खरेदी केली आहे.
मात्र, काही महिन्यांपूर्वीच रुपाली भोसलेने नव्या व्यवसायासाठी आणखी एक गाडी खरेदी केली होती. दिवाळीच्या मुहूर्तावर रुपालीकडे टोयोटा कारचं आगमन झालं होतं. याचे फोटो, व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी अभिनेत्रीच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट केली होती.
हेही वाचा : तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
रुपालीच्या घरी आली मर्सिडीज कार
आजपासून बरोबर ७ आठवड्यांपूर्वी रुपाली भोसलेच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने खोचक कमेंट केली होती. पण, अभिनेत्रीने या नेटकऱ्याला उत्तर दिल्याप्रमाणे तिचं स्वप्न खरं करून दाखवलं आहे.
संबंधित नेटकऱ्याने, “एवढा मेकअप करुन टोयोटा गाडी घ्यायला गेली? निदान मर्सिडीज, ऑडी, BMW यांच्यापैकी कोणती तरी गाडी असली पाहिजे होती.” अशी कमेंट अभिनेत्रीच्या पोस्टवर केली होती. रुपालीने यावर सौजन्याने, ‘येस नेक्स्ट कार’ असं उत्तर दिलं होतं. अभिनेत्रीने केलेला तो निश्चय आजच्या घडीला खरा ठरला आहे.
रुपालीच्या घरी अवघ्या सात आठवड्यांच्या आत आलिशान मर्सिडीज कारचं आगमन झालेलं आहे. ही गाडी खरेदी करताना रुपालीबरोबर तिचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. अभिनेत्री तिच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर ही गाडी खरेदी करण्यासाठी पोहोचली होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसत होता.
हेही वाचा : ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत होणार नवीन एन्ट्री; ‘या’ जेष्ठ अभिनेत्री दिसणार गुरूमाँच्या भूमिकेत
रुपालीने नवीन गाडी खरेदी केल्याच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांसह मराठी विश्वातील कलाकार मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिषेक देशमुख, गिरीजा प्रभू, गौरी कुलकर्णी, नेहा शितोळे, अश्विनी महांगडे, सिद्धार्थ जाधव, रेश्मा शिंदे, शशांक केतकर अशा अनेक सेलिब्रिटींनी रुपालीला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, रुपालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांनाच निरोप घेतला. आता येत्या काळात अभिनेत्री कोणत्या नव्या भूमिकेत झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd