‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’मधून घराघरात पोहोचलेली संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले ( Rupali Bhosle ) नेहमी चर्चेत असते. या मालिकेतील संजना या भूमिकेमुळे रुपाली अधिक प्रसिद्ध झोतात आली. तिने ही भूमिका उत्कृष्टरित्या पेलल्यामुळेच तिला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाला होता. अशा या लोकप्रिय रुपाली भोसलेला यंदाचा ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’ सोहळ्यात सर्वोत्त्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार कोणत्या अभिनेत्रीला मिळावा? याबाबत स्पष्ट केलं आहे. एवढंच नव्हे तर यासाठी रुपालीने प्रार्थनादेखील केली आहे.
‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’ सोहळा १६ मार्च पाहायला मिळणार आहे. संध्याकाळी सात वाजता यंदाचा पुरस्कार प्रसारित होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात ‘स्टार प्रवाह’ परिवारातील कलाकारांचा जबरदस्त परफॉर्मन्स होणार आहे. तसंच यंदाच्या सर्वोत्कृष्ट कलाकारांना गौरविण्यात येणार आहे. याशिवाय नव्या मालिकेची घोषणादेखील होणार आहे. सायली संजीव व चेतन वडनेरेची प्रमुख भूमिका असलेली ही नवी मालिका असणार आहे. त्यामुळे सध्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’ पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.’
‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’च्या रेड कार्पेटवर जुन्या मालिकेतील कलाकारांनीदेखील खास हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री रुपाली भोसलेचा ( Rupali Bhosle ) ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. तेव्हाच रुपालीने ‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधला. तेव्हा रुपालीला विचारलं की, सध्याची आवडती मालिका कोणती आणि कोणत्या अभिनेत्रीला बघायला आवडतं? या प्रश्नाचं उत्तर देत रुपाली भोसले म्हणाली, “आवडती खलनायिका सांगते. मला ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील ऐश्वर्याला ( अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर ) बघायला आवडतं. त्यामुळे माझी इच्छा आहे आणि मी प्रार्थना करते की, यंदा तिला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळावा.”
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यापासून रुपाली ( Rupali Bhosle ) वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळत आहे. तसंच ती तिच्या आईला घरगुती व्यवसायात हातभार लावताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिने आईबरोबर वेगवेगळे पदार्थ बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. पण, आता रुपाली लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं तिने स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितलं.