Rupali Bhosle Dance: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीचं तिने तिच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला. पारंपरिक पद्धतीने नव्या घराची वास्तूशांती केली. रुपालीच्या नव्या घराच्या वास्तूशांतीला बऱ्याच मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. सध्या रुपाली ‘आई कुठे काय करते’ या मालिकेबरोबर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत पाहायला मिळत आहे. जानकी-हृषिकेशच्या पुनर्विवाह निमित्ताने रुपालीची ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत एन्ट्री झाली आहे. अशातच रुपालीचा अभिनेता सुमीत पुसावळे व उदय नेनेबरोबरचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूजा सावंत हिचं नवं गाणं ‘नाच गो बया’ सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहे. त्यामुळे अनेक जण ‘नाच गो बया’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. अभिनेत्री रुपाली भोसलेला देखील या गाण्याची चांगलीच भुरळ पडली आहे. त्यामुळे तिने अभिनेता सुमीत पुसावळे व उदय नेनेबरोबर ‘नाच गो बया’ गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Anant Ambani Wedding: “जय गनेस” म्हणत मराठी अभिनेत्याची अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावर मार्मिक पोस्ट, म्हणाला, “लग्नातील सेट, कपडे भाड्याने…”

अभिनेत्री रुपाली भोसलेने सुमीत व उदयबरोबर केलेला डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तिघजण पूजा सावंतच्या ‘नाच गो बया’ गाण्यातील हूकस्टेप करताना दिसत आहे. तिघांचा हा डान्स व्हिडीओ पाहून इतर कलाकारमंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे.

हेही वाचा – Aishwarya Rai Bachchan: गरोदर असलेल्या दीपिका पदुकोणला पाहून ऐश्वर्या राय-बच्चन झाली भावुक, व्हिडीओ होतोय व्हायरल

रुपाली, सुमीत आणि उदयच्या या डान्स व्हिडीओवर अभिनेत्री अक्षया नाईक, आशिष पाटील, आयुष संजीव या कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर “एक नंबर”, “रॉकिंग रुपाली”, “खूप छान”, “कडक”, “जबरदस्त”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

पूजा सावंतचं नवं गाणं पाहून प्रेक्षक म्हणाले…

पूजा सावंत

दरम्यान, ‘नाच गो बया’ गाणं ५ जुलैला प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला आतापर्यंत युट्यूबवर ११ लाख ९५ अधिक व्हूज मिळाले आहेत. तर २० हजारांहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. तसंच, “खूप छान गाणं झालंय”, “सर्व महिलांनी एकत्र येऊन खूप छान डान्स केला”, “अतिशय उत्तम संकल्पना”, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या उमटल्या आहेत. या गाण्यात पूजा सावंतसह अभिनेत्री अक्षया नाईक, आकांक्षा गाडे, आयुष संजीव, निक शिंदे आणि तश्वी भोईर झळकली आहे. या तगड्या कलाकारांच्या नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी लोकप्रिय आशिष पाटील आणि चेतन महाजनने सांभाळली होती. प्रशांत नेटकेने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.