छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. या मालिकेत संजना ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली भोसले हिलाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ती या मालिकेत नकारात्मक भूमिका जरी साकारत असली तरी तिने तिच्या कामाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे आणि सोशल मीडियावरही ती सक्रिय राहून तिच्या आयुष्याबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने नुकतीच प्रेमाबद्दल एक पोस्ट केली आहे.
रूपाली नेहमीच तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यमुळे ही चर्चेत असते. आजूबाजूला घडत असणाऱ्या तिला पटणाऱ्या किंवा न पटणाऱ्या गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टपणे मांडताना दिसते. अशातच तिने तिच्या प्रेमाबद्दल केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
आणखी वाचा : प्रसाद जवादेला अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचं होतं करिअर, स्वतःच्या मृत्यूचा उल्लेख करत म्हणाला…
तिचं हे अतूट नातं आहे ती कोणीही व्यक्ती नसून ते आहे ट्रॅफिक. तिने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. यावेळी ती गाडीतून प्रवास करत असून तिच्या गाडीच्या पुढे वाहनांची मोठीच्या मोठी रांग लागलेली दिसत आहे. या व्हिडिओत जरी ते वैतागलेली दिसत असली तरी कॅप्शनमध्ये मात्र तिने तिच्या ट्रॅफिकशी असलेल्या प्रेमाच्या नात्यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा : Video: बॉलिवूड पदार्पणाचा आनंद गगनात मावेना, बार काउंटरवर चढून बेभान होऊन नाचली ‘ही’ मराठी अभिनेत्री
ट्राफिकमध्ये अडकलेल्या रूपालीने ‘मान मेरी जान’ या गाण्यावर एक्सप्रेशन्स देत ती अत्यंत वैतागलेली असल्याचं दाखवलं आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं, “ट्रॅफिक आणि मी मेड फॉर इच अदर आहोत. मला रोज शूटिंग सेटवर पोहोचायला फक्त ७ मिनिटं लागतात. प्रवासात वेळ जाऊ नये म्हणून मी ठाण्याला शिफ्ट झाले. मला वाटलं यामुळे मला स्वत:ला वेळ देता येईल. पण ट्रॅफिकचं माझ्यावर खुपच प्रेम आहे. तो मला एकटीला सोडतच नाही. ७ मिनिटाच्या अंतरावर जायला आज १ तास लागला. आपण टाईम इज मनी म्हणतो हे चुकीचं आहे…तुम्हालाही असंच वाटतं का?” तिचा हा व्हिडिओ चाहतांना आवडला असून चाहते यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.