‘स्टार प्रवाह’वरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपापली भूमिका उत्कृष्टरित्या निभावल्यामुळे प्रेक्षकांचं त्यांना भरभरून प्रेम मिळत आहे. मग नायिका असो किंवा खलनायिका या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक घर निर्माण केलं आहे. यातील एक लोकप्रिय भूमिका म्हणजे संजना. अभिनेत्री रुपाली भोसले हिनं संजना उत्तमरित्या साकारली आहे. पण ही भूमिका स्वीकारण्यापूर्वी रुपालीने एक विचार केला होता, त्यानंतरच संजनाची भूमिका तिनं स्वीकारली. याचा किस्सा तिने ‘लोकसत्ता ९९९’ या कार्यक्रमादरम्यान सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘ही’ आघाडीची मराठी अभिनेत्री आहे निखिल बनेची मोठी चाहती; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर जाऊन अभिनेत्याला म्हणाली…

रुपाली पूर्वी संजना ही भूमिका अभिनेत्री दिपाली पानसरेने साकारली होती. पण काही काळानंतर तिची मालिकेतून एक्झिट झाली आणि संजना म्हणून रुपाली झळकली. पण भूमिका स्वीकारताना रुपालीची काय भावना होती? याविषयी ती बोलली. ती म्हणाली, “मी ‘आई कुठे काय करते’ मालिकेला सहजरित्या होकार दिला नाही. कोरोना काळात या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. या काळात काम आलं तर आपण करुयाच, असं मी ठरवलं होतं. कुठेतरी हा एक आत्मविश्वास होता की, काहीही झालं, ब्रेक लागला पण थोड्या दिवसात काम सुरू होणार आहे. आणि आपल्याला योग्यतेच काम मिळणार आहे. त्यामुळे तोपर्यंत थांबूया, धावायची गरज नाही.”

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद होणार का? अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले…

पुढे रुपाली म्हणाली की, जेव्हा संजना भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा मला याच्यात जास्त स्वारस्य होतं की, संजना या मालिकेत का आहे? संजनाचं नेमकं काय म्हणणं आहे? मालिकेसाठी संजनाची भूमिका तितकी महत्त्वाची आहे का? अशीच आहे की शोभेची बाहुली आहे? ग्लॅमरस फेस आहे, ग्लॅमरस व्यक्तिमत्त्व आहे. फक्त अनिरुद्धची गर्लफ्रेंड आहे, विवाहबाद्य संबंध ठेवणारी मुलगी आहे. एवढंच जर असेल तर मी म्हटलं मला यात काही स्वारस नाही. पण ती का आहे? मालिकेत तेवढी वजनदार भूमिका असेल, तिच्या भोवती कथा असेल तर मला त्यात रस आहे. कारण मला माझ्या कामातून समाधान मिळणं गरजेचं आहे. ते मिळालं नाही तर मग माझी चिडचिड होते. संजना मालिकेत का आहे? आणि तिचं महत्त्व काय आहे? असं सर्व काही जाणून घेतल्यानंतरच मी होकार दिला.

हेही वाचा – ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर डान्स रील्समुळे ट्रोल; अभिनेत्रीने सुनावले खडे बोल

दरम्यान, रुपालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच तिनं हिंदी मालिकांमध्ये काम करून आपला ठसा उमटवला आहे. शिवाय ती बिग बॉस मराठीतही झळकली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupali bhosle thinking this point then accepted the role of sanjana in aai kuthe kay karte pps
Show comments