गेल्या काही दिवसांपासून या लोकप्रिय मालिकेची खूप चर्चा सुरू आहे. सतत मालिकेसंदर्भात निगेटिव्ह बातम्या समोर येत आहेत. तसंच या मालिकेतील काही कलाकार देखील निर्मात्यांवर आरोप करताना दिसत आहेत. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणारी ही मालिका खूप चर्चेत आहेत.

ही मालिका दुसरी तिसरी कोणती नसून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘अनुपमा’ मालिका आहे. अभिनेत्री रुपाली गांगुलीची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटवर एक मोठा अपघात झाला आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीचा जीव गेला आहे.

samruddhi expressway 233 deaths
दोन वर्षे, दीड कोटी वाहने, १४० अपघात, २३३ मृत्यू!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
two daughters of a sugarcane cutter died
ट्रॅक्टर अपघातात ऊसतोड मजुराच्या दोन्ही मुलींचा मृत्यू
Mumbai Bus Accident
Mumbai Bus Accident : मुंबईत बेस्टच्या बसची अनेकांना धडक, ३ ठार, १७ गंभीर जखमी
pune two wheeler accident marathi news
पुणे : सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गात दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जण जखमी
Trailer crashes into food court on pune Mumbai Express highway
पुणे-मुंबई द्रुतगतीवरील अपघातात ते सहा सेकंद महत्वाचे ठरले! सहा जण थोडक्यात बचावले
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान

हेही वाचा – Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजसने सोलापुरी भाषेत मानसीला केलं प्रपोज, म्हणाला, “बार्शी तिथं सरशी…”

‘टेली चक्कर’च्या वृत्तानुसार, ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटवर मोठा अपघात झाला आहे. ज्यामध्ये मालिकेच्या क्रू कॅमेरा असिस्टंटचा मत्यू झाला आहे. या व्यक्तीची ओळख उघड झालेली नाही. पण ही घटना गुरुवारी १४ नोव्हेंबरला सेटवर झाली. सेटवर त्या व्यक्तीला विजेचा धक्का बसला. यामुळे सेटवर एकच खळबळ उडाली. घटनेनंतर तातडीने व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेबाबत अजूनपर्यंत निर्मात्यांकडून अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. पण पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

हेही वाचा – “लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…

रुपाली गांगुलीने सावत्र लेकीविरोधात केला मानहानीचा दावा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ‘अनुपमा’ मालिकेतील रुपाली गांगुली खूप चर्चेत आहे. रुपालीची सावत्र मुलगी ईशा वर्माने तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ईशाने सांगितलं की, अभिनेत्रीने तिला मानसिक त्रास दिला आणि तिने तिच्या आईला चुकीची वागणूक दिली. एवढंच नव्हे तर रुपाली गांगुलीमुळे तिचे आई-वडील विभक्त झाले आहेत. या गंभीर आरोपांवर रुपाली गांगुलीने कोणतही भाष्य केलं नाही. पण, आपल्या सावत्र मुलीवर ५० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला.

हेही वाचा – Bigg Boss 18मध्ये इन्फ्लुएन्सर, इकडे गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर केली ब्रेकअपची घोषणा, सात महिन्यात संपलं नातं

तसंच मालिकेतील इतर कलाकारांनी रुपालीचं नाव न घेता तिच्यावर आरोप केले आहेत. काही कलाकारांनी सांगितलं की, रुपाली गांगुलीमुळे मालिकेतून काढण्यात आलं. काहीचे सीन काढून टाकण्यात आले. अशातच काही दिवसांपूर्वी निर्माते राजन शाही यांनी रुपालीबाबत एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी रुपाली गांगुलीला पाठिंबा दिला होता.

Story img Loader