‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेमुळे अभिनेत्री ऋतुजा बागवे घराघरांत लोकप्रिय झाली. मालिका, नाटक, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करून अभिनेत्रीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. नुकतंच ऋतुजाने ठाण्यात हक्काचं घर घेत तिचं स्वप्न पूर्ण केल. ऋतुजा बागवेच्या नव्या घरातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने आजारपणामुळे गणपती बाप्पाला घातलं होतं ‘हे’ साकडं, खुलासा करत म्हणाली…

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क

ऋतुजा बागवेने गृहप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यामध्ये तिच्या संपूर्ण घराची झलक नेटकऱ्यांना पाहायला मिळाली. ऋतुजाच्या घरातील एका भिंतीवर मोठ्या अक्षरांमध्ये विठ्ठलाचं नावं लिहिलेलं आहे. या ठिकाणी अभिनेत्रीच्या आई-बाबांनी कमरेवर हात ठेवून फोटो काढला आहे. या फोटोचं नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं. अभिनेत्री स्पृहा जोशीने या फोटोवर कमेंट करत “विठ्ठल-रखुमाईचा फोटो सर्वात गोड” असं लिहिलं होतं. तिने इन्स्टाग्रामवर याचा खास व्हिडीओ शेअर करत या सुंदर कलाकृतीमागची गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितली आहे.

हेही वाचा : “एका म्हातारीने माझी गचांडी पकडली अन्…” ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आला होता भयानक अनुभव

ऋतुजा बागवे म्हणाली, “घर घेतल्यानंतर ते कसं सजवायचं हे मी तेव्हा ठरवलं नव्हतं. पण, एक गोष्ट नक्की ठरवली होती ती म्हणजे घरातील एका भिंतीवर सचिन गोताड यांच्याकडून विठ्ठलाची कलाकृती साकारून घ्यायची. माऊलींचा आशीर्वाद कायम राहावा ही एकच इच्छा होती आणि ती माझ्या जवळच्या मित्राने पूर्ण केली.”

हेही वाचा : आई-बाबांनी नव्हे तर ‘या’ व्यक्तीने ठेवलंय गश्मीरचं नाव, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

दरम्यान, ऋतुजाच्या आनंदात मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सहभागी झाले होते. या सर्वांबरोबरचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कष्टाने हक्काचं घर घेतल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Story img Loader