‘स्वप्नांच्या पलिकडले’, ‘सूर राहू दे’ या मालिकांमधून अभिनेत्री गौरी नलावडे घराघरांत लोकप्रिय झाली. गौरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अभिनयाबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच गौरीने तिच्या गोवा वेकेशनमधला एक फोटो शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच गौरीने गोव्यात पूलमध्ये काढलेला एक फोटो शेअर केला आहे. यात ती गुलाबी रंगाच्या स्विमिंग कॉस्ट्यूममध्ये दिसतेय. याचे फोटोज तिने आधीही तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. “तुम्ही सनस्क्रीन लावली पाहिजे याची आठवण करून देणारी ही पोस्ट आहे”, असं भन्नाट कॅप्शनही गौरीने या फोटोला दिलं आहे.

गौरीने पोस्ट केलेल्या या फोटोजवर अनेक चाहत्यांच्या तसेच कलाकारांच्यादेखील कमेंट्स आल्या आहेत. यातलीच एक कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ‘नांदा सौख्य भरे’, ‘चंद्र आहे साक्षीला’ अशा मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने गौरीच्या या फोटोवर खास कमेंट केली आहे. “सुपर हॉट, काश मैं लडका होता” (जर मी मुलगा असते तर…) अशी लक्ष वेधणारी कमेंट ऋतुजाने केली आहे. यावर रिप्लाय म्हणून गौरीने हसण्याचं आणि हार्ट इमोजी वापरलं आहे.

ऋतुजाची ही कमेंट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. नेटकऱ्यांनी निशाणा साधून ऋतुजाच्या या कमेंटला रिप्लाय दिला आहे. काही जणांनी हसण्याच्या इमोजी वापरल्या आहेत, तर एकाने चक्क असं लिहिलं की, “तसंही भाई तू मुलगाच आहेस.”

सायली संजीव, खुशबू तावडे, आरती मोरे अशा अनेक अभिनेत्रींनी गौरीच्या या फोटोजवर कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, गौरी नलावडेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ललित प्रभाकर अभिनीत ‘टर्री’ या चित्रपटात गौरी शेवटची झळकली होती. गौरीने मालिकांसह ‘कान्हा’, ‘गोदावरी’ अशा अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rutuja bagwe commented on gauri nalawades pool photo went viral dvr