अनेक मराठी कलाकार यंदा लग्नबंधनात अडकले. ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत इंद्राच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता ऋतुराज फडके यानेही २७ जानेवारीला लग्नगाठ बांधली. त्याच्या पत्नीचं नाव प्रिती आहे. लग्नानंतर ऋतुराज मालिकांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे, त्यामुळे त्याला पत्नीला वेळ देता येत नाहीये. अशातच आता त्याने बायकोसाठी खास पत्र लिहिलं आहे.

ऋतुराजने लिहिलं, पत्र लिहिण्यास कारण की..

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?

प्रिय बायको..
गेले अनेक दिवस मी दोन मालिकांचे शूटींग करत असल्यामुळे भेट होत नाही, शूटींगचा सेट माझ्या घरापासून २.३० तास अंतरावर असल्यामुळे, माझे रोजचे १७ तास शूटींग आणि प्रवासात जातात, त्यामुळे गेले काही दिवस प्रत्यक्ष भेटून एकमेकांशी गप्पाच झाल्या नाहीत.. काल बाहेर ४१ डिग्री तापमान होतं आणि मी out door ला शूटींग करत होतो, फाईट सिक्वेन्स करत होतो, दिवसभर हे सुरू होतं. ऊन प्रचंड असल्यामुळे प्रोडक्शने विशेष काळजी घेतली होती. (लिंबू पाणी, थंड पाणी, पंखे,) तरी त्रास होत होता.. ४१ डिग्री मध्ये जमिनीवर अनवाणी पायाने मला धावा धाव करायची होती. तळपत्या उन्हात पाय ठेवणं म्हणजे जळत्या कोळशावरती पाय ठेवल्या सारख वाटत होतं, सकाळी ७ वाजेपासून सुरु झालं ते संध्याकाळी ५.३० वाजता संपलं, घरी आलो माझा थकलेला चेहरा बघुन आईनी डोक्याला तेल लाऊन दिलं, गरम गरम चहा दिला, खूप थकलो असल्यामुळे थोड्याच वेळ गप्पा मारून झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी शूटींगला जायचं होतं, मला झोप लागली, साधारण मध्यरात्री माझ्या पायाला कोणीतरी काही तरी करतंय हे जाणवलं, मी जागा झालो तर, माझी बायको माझ्या तळपायाला “कैलास जीवन” लावत होती. कारण उन्हात पळून माझ्या पायाला बऱ्यापैकी दुखापत झाली होती, मी घरी सांगितलं नव्हतं, जे घरातल्या घरात मी चालत होतो, त्या वरून माझ्या बायकोला जाणीव झाली होती, की ह्याला त्रास होतोय, तिने ३ ते ४ वेळा विचारलं सुद्धा पायाला तेल किंव्हा क्रीम लाऊन देऊ का? मी म्हटल नको नंतर मी लावीन आणि हे बोलून मी गाढ झोपून गेलो, तर मध्य रात्री तू माझ्या पायाला कैलास जीवन लावत होतीस, ह्या आणि अश्या बऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या साठी तू न सांगता करतेस, आपलं लग्न होण्याच्या आधी ४ वर्ष रिलेशनमध्ये होतो, तेव्हा सुद्धा अश्या बऱ्याच गोष्टी तू माझ्या साठी केल्या आहेस, काल म्हणजे तू जे केलं आहे ते म्हणजे खरंच.. माझ्याकडे शब्द नाहीत.. माझं खरच भाग्य आहे की, तुझ्या सारखी बायको, मैत्रीण माझ्या आयुष्यात आहे, तू मला जो सपोर्ट करतेस, ज्या प्रकारे माझ्या मागे खंबीरपणे उभी राहते आहेस, त्यामुळे मी इतका पळू शकतो आहे..तुला मला thank you म्हणायचं नाहीये कारण ते तुला आवडणार नाही.. पण सगळ्यांन समोर i love you नक्कीच म्हणीन.”
(आपली माणसं आपल्यासाठी नकळत खूप काही करत असतात आपण परतफेड नाही करू शकत किमान आपण त्याच्या बद्दल दोन शब्द लिहू नक्कीच शकतो)
, अशी पोस्ट ऋतुराजने केली. त्यावर त्याची पत्नी प्रितीने कमेंट केली आहे.

“तुझ्या इतकं छान मन मोकळे पणाने मला लिहिता येणार नाही पण इतकच म्हणेन की मी आयुष्यभर तुझ्या मागे खंबीर पणे उभी असेन.. Love you too” अशी कमेंट प्रितीने केली आहे.

Story img Loader