अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. अधिक महिना श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. यंदा श्रावण महिन्यात अधिकमास आला आहे. दर तीन वर्षांतून एकदा वर्षातील एक अतिरिक्त महिना असतो ज्याला अधिकामास म्हणतात. हा अधिक मास १६ ऑगस्टला संपणार आहे. त्यामुळे यंदाचा चातुर्मास पाच महिन्यांचा असून, ८ श्रावणी सोमवार करण्याची संधी मिळणार आहे. याच निमित्ताने गायक प्रथमेश लघाटेने एक पोस्ट शेअर केली आहे.
प्रथमेश लघाटे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच प्रथमेशने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने सिंधुदुर्गातील किर्लोस या गावात असणाऱ्या श्री रामेश्वर मंदिराचे दर्शन घडवले आहे. त्याचा एक व्हिडीओही त्याने युट्यूबला शेअर केला आहे.
आणखी वाचा : “प्रथमेश लघाटेने प्रपोज केल्यानंतर होकार देण्यासाठी तीन दिवस का घेतले?” मुग्धा म्हणाली, “कारण मला…”
प्रथमेशने शेअर केलेल्या या पोस्टखाली त्याच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे. “हा अधिक श्रावण आहे, या नंतर श्रावण लागेल”, अशी कमेंट एकाने केली आहे. त्यावर प्रथमेशने चांगलेच उत्तर दिले आहे.
“अधिक श्रावणातला सोमवार देखील तितकाच महत्वाचा असतो. फक्त तुमच्या माहितीसाठी”, असे प्रथमेश लघाटे म्हणाला आहे. त्यावर त्या चाहत्याने “हो आहेच. काही शंका नाही”,असे म्हटले आहे.
आणखी वाचा : Video : चांदीच्या ताटातील पक्वान्न, सुंदर उखाणा अन्… प्रथमेश लघाटेच्या पहिल्या केळवणाचा थाट पाहिलात का?
दरम्यान ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रथमेश लघाटे घराघरात पोहोचला. तो सध्या त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. प्रथमेश लवकरच गायिका मुग्धा वैशंपायनबरोबर विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी प्रेमाची कबुली दिली.