सध्याच्या तरुण पिढीतील आघाडीच्या गायकांपैकी एक म्हणून प्रथमेश लघाटेला ओळखले जाते. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून ते प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. त्याच्या गायनाचं नेहमीच भरभरून कौतुक होत असतं. काही दिवसांपूर्वी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यातच आता प्रथमेशने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

प्रथमेश लघाटे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच प्रथमेशने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने त्याला ब्लू टिक मिळाल्याचे सांगितले आहे.
आणखी वाचा : “हा अधिक श्रावण आहे, यानंतर श्रावण लागेल”, चाहत्याच्या कमेंटवर प्रथमेश लघाटेने दिलं उत्तर, म्हणाला “तुमच्या माहितीसाठी…”

“अखेर मला अधिकृतरित्या ब्लू टिक मिळाले. आज माझे इन्स्टाग्राम अकाऊंट व्हेरिफाईड झाले. धन्यवाद इन्स्टाग्राम, असे प्रथमेश लघाटेने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : Video : चांदीच्या ताटातील पक्वान्न, सुंदर उखाणा अन्… प्रथमेश लघाटेच्या पहिल्या केळवणाचा थाट पाहिलात का?

दरम्यान ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रथमेश लघाटे घराघरात पोहोचला. तो सध्या त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. प्रथमेश लवकरच गायिका मुग्धा वैशंपायनबरोबर विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी प्रेमाची कबुली दिली.

Story img Loader