‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर आता त्या दोघांच्याही घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे. आता त्या दोघांनीही त्यांचं प्रेम कसं जुळलं, कोणी प्रपोज केला, लग्न कधी करणार याबद्दल खुलासा केला आहे.

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या दोघांनी नुकतंच ‘राजश्री मराठी’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला प्रथमेशने प्रपोज केल्यावर होकार द्यायला तीन दिवस का घेतले? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने फार मनमोकळेपणाने उत्तर दिले.
आणखी वाचा : Video : चांदीच्या ताटातील पक्वान्न, सुंदर उखाणा अन्… प्रथमेश लघाटेच्या पहिल्या केळवणाचा थाट पाहिलात का?

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
graphic representing the issue
Honor Killing : बापाने पोलिसांसमोरच पोटच्या मुलीवर झाडल्या गोळ्या, चार दिवसांवर आलं होतं लग्न; नेमकं काय घडलं?
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”

“आम्हाला दोघांनाही माहिती होतं की आमच्या दोघांच्या मनात काय आहे. तिचं उत्तर काय असणार आहे, हे देखील माहिती होतं. पण शेवटी थोडी टांगती तलवार असते डोक्यावर, तशी होती. माझ्या डोक्यावर तीन दिवस टांगती तलवार होती”, असे प्रथमेश म्हणाला.

यावर मुग्धा म्हणाली, “मी तीन दिवसांचा कालावधी घेण्यामागे खरं तर खूप छान कारण होतं. मला त्याने एका कार्यक्रमाच्या रिहर्सलदरम्यान विचारलं होतं. ती रिहर्सल झाल्यानंतर त्याने मला विचारलं होतं.”

“माझ्या चेहऱ्यावरुन त्याला उत्तर माहिती असेलच, याची मला खात्री आहे. पण तरी मी तेव्हा त्याला उत्तर दिलं नाही. त्याचं कारण म्हणजे माझा तीन दिवसांनी वाढदिवस होता. त्यामुळे मला असं वाटतं होतं की जर मला विचारलं आहे तर आपण काही तरी चांगल्या दिवशी हो म्हणू. तो दिवस कायम लक्षात राहायला हवा, यासाठी मग मी तीन दिवसांचा अवधी घेतला”, असे तिने सांगितले.

“माझ्यासाठी ते तीन दिवस खरंच खूप कठीण होते. पण मी ते घालवले आणि वाढदिवसाच्या दिवशी त्याला होकार दिला”, असेही मुग्धा म्हणाली.

आणखी वाचा : “…तर मी दोन मुलांची आई असते”, केतकी चितळेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “वयाच्या चौथ्या वर्षी…”

दरम्यान प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी संगीत क्षेत्रात त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पंधरा वर्षांपूर्वी झालेली त्या दोघांची मैत्री आजही कायम आहे. आता त्यांनी या मैत्रीला पुढे नेण्याचा निर्णय घेत प्रेमाची कबुली दिली. प्रथमेश आणि मुग्धा यांनी सोशल मीडियावर त्या दोघांचा एक फोटो शेअर करत त्यांचं नातं जाहीर केलं होतं.

Story img Loader