‘सा रे ग म प’चं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २९ जुलैपासून या कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला सुरुवात होणारआहे. नुकतंच या कार्यक्रमाचे ऑडिशन मुंबईत कुठे, कधी होणार याची माहिती समोर आली आहे. याद्वारे होतकरु गायकांना जनतेसमोर आपल्या गायनकलेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून ‘झी टीव्ही’ वाहिनीने प्रेक्षकांसाठी अंताक्षरी, सा रे ग म प, डान्स इंडिया डान्स आणि इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ यासारखे कार्यक्रम करताना दिसते. गेल्यावर्षी सा रे ग म प लिटल चॅम्प्सच्या उदंड यशानंतर आता लवकरच ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ हा कार्यक्रम सुरु होणार आहे. याद्वारे देशातील होतकरु गायकांना जनतेसमोर आपल्या गायनकलेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. तसेच पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आपली कारकीर्द उभी करण्याची संधी या कार्यक्रमामुळे मिळणार आहे.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ नाकारणाऱ्या निर्मात्याने केदार शिंदेना केला मेसेज, म्हणाला “माझी बस चुकली, पण…”

‘सा रे ग म प २०२३’साठी शनिवार २९ जुलै रोजी मुंबई शहरात प्रत्यक्ष ऑडिशन्सला सुरुवात होईल. जर तुम्ही १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे असाल, तर तुम्हाला ही संधी उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाइन ऑडिशन्स यापूर्वीच सुरू झाल्या असून त्यासाठी तुम्हाला केवळ झी५ अॅप असणं गरजेचे आहे. त्याचा वापर करुन योग्य त्या गटात प्रवेश करून तुम्ही आपली प्रवेशिका पाठवू शकता.

  • मुंबई ‘सा रे ग म प २०२३’ ऑडिशन्स
  • ऑडिशन तारीख – २९ जुलै २०२३
  • वेळ – सकाळी ८ वाजल्यापासून
  • स्थळ : नाहर इंटरनेशनल स्कूल, नाहरचा अमृत शक्ती रोड, डीपी रोड नं. २, चांदिवली, पवई, मुंबई- ४०००७२.

आणखी वाचा : “आमचा साडेतीन वर्षांचा संसार…” दोनदा घटस्फोट झालेल्या व्यक्तीबरोबर लग्न करणाऱ्या नेहा पेंडसेचे वक्तव्य, म्हणाली “लग्नानंतर स्त्रियांनाच…”

दरम्यान काही दिवसांपूर्वी गुवाहाटी, कोलकाता, बंगळुरू, लखनौ, चंदिगड, जयपूर, दिल्ली, वडोदरा आणि पुणे या शहरांमध्ये ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता झी टीव्ही मुंबई शहरातही प्रत्यक्ष स्थळांवर ऑडिशन्स घेणार आहे. तेव्हा तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमचा आवाज सुरेल आहे आणि तो जगापुढे सादर केला पाहिजे, तर तुम्हाला ऑडिशन्समध्ये सहभागी व्हावे लागेल.