‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका सततच्या रंजक वळणामुळे प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. सात महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील उमा असो, रघुनाथ खोत असो किंवा निशी, ओवी ही सगळी पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटतं आहेत. नुकतंच या मालिकेतील एका अभिनेत्याने गर्लफ्रेंडसह गणपती पुळेच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. दोघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकर गर्लफ्रेंडसह गणपती पुळेला गेला होता. अभिषेकची गर्लफ्रेंड डिजिटल क्रिएटर असून सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. अभिषेकप्रमाणेच तिचा देखील चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तिचं नाव आहे सोनाली गुरव. सोनालीनेच अभिषेकबरोबरचे गणपती पुळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – गरोदर असताना झाला अपघात अन् मग…; जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “लेकींना गमावण्याची…”

“गणपती बाप्पा मोरया”, असं कॅप्शन लिहित अभिषेकच्या गर्लफ्रेंडने गणपती पुळ्यातील बाप्पाच्या मंदिराबाहेरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिषेक क्रिम कलरचा कुर्ता व पांढऱ्या कलरच्या धोतीमध्ये पाहायला मिळत आहे. तर गर्लफ्रेंड सोनाली ऑफ व्हाइट कलरच्या साडीत सुंदर दिसत आहे. अभिषेक व सोनालीच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “दोघांचं ठरलं का?”, असं विचारत आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलं, “जोडी नंबर वन.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “ठरलं वाटतं?” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “लग्न ठरलं की काय?” याशिवाय अनेक मजेशीर प्रतिक्रिया अभिषेक व सोनालीचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – “जिजाजींना नाही आणलं का?” साखरपुड्यानंतर मुंबईत आल्यावर अदिती राव हैदरीला प्रश्न, अभिनेत्री लाजत म्हणाली…

दरम्यान, अभिषेकच्या कामाबद्दल बदल बोलायचं झालं तर, तो ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेपूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये विविध भूमिकेत पाहायला मिळाला होता. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेत झळकला होता. तसेच ‘सन मराठी’वर ‘माझी माणसं’ या मालिकेतही तो पाहायला मिळाला. अभिषेकची ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील भूमिका गाजली होती.

Story img Loader