‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सारं काही तिच्यासाठी’ काही महिन्यांपूर्वी ऑफ एअर झाली. पण, या मालिकेतील कलाकारांनी आपापल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. यापैकी एक म्हणजे श्रीनू. अभिनेता अभिषेक गावकरने उत्कृष्टरित्या श्रीनिवास सावंत म्हणजे श्रीनूची भूमिका साकारली होती. या लाडक्या श्रीनूने म्हणजेच अभिषेक गावकरने काही दिवसांपूर्वी लग्न केलं आणि लग्नानंतर लगेच बायकोचं नाव बदललं. पण अभिषेकने बायकोचं नाव का बदललं? यामागचं कारण दोघांनी स्पष्ट केलं आहे.
२६ नोव्हेंबरला अभिषेक गावकरने सोशल मीडिया रील स्टार सोनाली गुरवशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. मोठ्या थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा मालवणात पार पडला होता. अभिषेक आणि सोनालीच्या लग्नसोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी खास हजेरी लावली होती. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हेही वाचा – नांदा सौख्यभरे! अखेर किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकर अडकले लग्नबंधनात, मोठ्या थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
सोनालीने लग्नानंतरचे फोटो शेअर करत नाव बदलल्याचं जाहीर केलं. मिसेस वामिका अभिषेक गावकर असं नाव बदलल्याचं सांगितलं. पण सोनालीचं लग्नानंतर नाव का बदललं? यामागचा किस्सा ‘लोकमत फिल्मी’च्या मुलाखतीमध्ये दोघांनी सांगितला.
हेही वाचा – Video: ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वरातीत मराठी कलाकारांचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ आला समोर
सोनाली म्हणाली, “अभिषेकला वामिका नावं खूप आवडलं होतं. त्यामुळे तो म्हणाला की, माझ्या मुलीचं नाव मी वामिका ठेवणार. वामिकाचा अर्थ लक्ष्मी असा होतो. नंतर त्याला असं वाटलं की, मी त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याच्याकडे खूप लक्ष्मी आली. तर अभिषेक म्हणाला, मी लग्नानंतर तुला नाव देतो. मी म्हटलं ठीक आहे.”
पुढे अभिषेक गावकर म्हणाला, “नाव बदलण्याआधी मी तिला विचारलं, लग्नानंतर तुला नाव बदलण्याची इच्छा आहे का? कंटाळी आहेस सोनाली नावाला? तर ती म्हणाली, नाही, बदलायचं असेल, तर एखादं नाव तू सुचवं. एखादं आवडलं तर मी नक्कीच ठरवेन. तर मी म्हटलं, वामिका नाव आहे. त्यामागचं कारण सांगितलं. तिला वामिका नाव खूप आवडलं आणि ती लगेच नाव बदलायला तयार झाली. लग्नाच्या आधीपासूनच तिने सांगितलं की, मला वामिका नावाने हाक मारायला सुरुवात कर म्हणजे मला सवय होईल.”
हेही वाचा – Bigg Boss 18: पाच नॉमिनेटेड सदस्यांपैकी ‘हा’ स्पर्धक १०व्या आठवड्यात गेला घराबाहेर, नाव वाचून बसेल धक्का
दरम्यान, अभिषेक गावकरच्या कामाबद्दल बदल बोलायचं झालं तर, तो ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेपूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये विविध भूमिकेत पाहायला मिळाला होता. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेत झळकला होता. तसंच ‘सन मराठी’वर ‘माझी माणसं’ या मालिकेतही तो पाहायला मिळाला. अभिषेकची ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील भूमिका गाजली होती. अभिषेक प्रमाणे बायको सोनालीचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे सोशल मीडियावर ३ लाख १८ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.