‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप २५ ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकला. अत्यंत साध्या पद्धतीत पृथ्वीकचा लग्न समारंभ पार पडला. प्राजक्ता वायकुळ असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. २५ ऑक्टोबरला पृथ्वीकने अचानक लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. “एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने”, असं सुंदर कॅप्शन लिहून पृथ्वीकने लग्नाचे फोटो शेअर केले होते. अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्काच बसला होता. पृथ्वीकनंतर आता आणखी एक लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लवकरच लग्नबंधनात अडकणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्याचा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर साखरपुडा झाला होता. मोठ्या थाटामाटात त्याचा साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्याआधी तो होणाऱ्या पत्नीसह गणपती पुळेच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आतापर्यंत लग्नबंधनात अडकणारा अभिनेता कोण हे ओळखचं असेल?

हेही वाचा – Bigg Boss 18: चाहत पांडेमुळे रजत दलाल आणि अविनाश मिश्रामध्ये जोरदार भांडण, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतलेली मालिका ‘सारं काही तिच्यासाठी’मधील श्रीनू म्हणजे अभिनेता अभिषेक गावकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना अभिषेकने कधी लग्न करणार? याचा खुलासा केला. लग्नाविषयी बोलताना अभिषेक म्हणाला, “मी खूप खुश आहे. माझ्या आयुष्यात एक आमूलाग्र बदल होणार आहे.”

तेव्हा त्याला विचारलं की, कधी होणार आहे? यावर अभिषेक गावकर म्हणाला, “हे लगेचच…मी नोव्हेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकलो जाणार आहे. मी, सोनाली आणि सर्वजण लग्नाची आतुरतेने वाट बघत आहोत.”

हेही वाचा – Video: तोंड लपवत सूरज चव्हाणची अजित पवारांच्या बारामती सभेत एन्ट्री, एका मिनिटांचं केलं भाषण; म्हणाला, “दादांना झापूक झुपूक…”

अभिषेक गावकरची होणारी पत्नी कोण आहे?

अभिषेक गावकरची होणारी पत्नी डिजिटल क्रिएटर असून सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. सोनाली गुरव असं तिचं नाव आहे. सोनालीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ३ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

हेही वाचा – ‘धर्मवीर’ चित्रपटासाठी प्रसाद ओक एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल ‘इतके’ दिवस होता लिक्वीड डाएटवर, यामागचं कारण जाणून घ्या…

दरम्यान, अभिषेक गावकरच्या कामाबद्दल बदल बोलायचं झालं तर, तो ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेपूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये विविध भूमिकेत पाहायला मिळाला होता. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेत झळकला होता. तसेच ‘सन मराठी’वर ‘माझी माणसं’ या मालिकेतही तो पाहायला मिळाला. अभिषेकची ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील भूमिका गाजली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saara kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar will get marriage in november pps