टीव्हीवरील काही मालिका इतक्या लोकप्रिय होत्या की त्या बंद होऊन आता बरीच वर्षे झाली असली तरी प्रेक्षकांना लक्षात आहेत. इतकंच नाही तर त्या मालिकेतील पात्रं व कलाकार प्रेक्षकांना आजही जवळचे वाटतात. अशीच एक मालिका म्हणजे ‘साथ निभाना साथिया’ होय. ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेत अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी व अभिनेता मोहम्मद नाझिम यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. देवोलीना ‘गोपी बहू’च्या तर मोहम्मद नाझिम ‘अहम’च्या भूमिकेत दिसला होता.
मोहम्मद नाझिम आणि देवोलिना यांनी ‘साथ निभाना साथिया’ मालिकेत अनेक वर्षे एकमेकांबरोबर काम केलं होतं. हे दोघेही एका जोडप्याच्या भूमिकेत होते, त्यामुळे या दोघांनी एकत्र अनेक सीन शूट केले होते आणि त्यांचे बाँडिंग खूप चांगले झाले होते. मात्र, एकदा असं काही घडलं की अभिनेत्याने देवोलीनाला शिवीगाळ केली होती, त्यानंतर सात-आठ महिने दोघेही बोलले नव्हते.
एकदा ‘साथ निभाना साथिया’च्या सेटवर मोहम्मद नाझिम आणि देवोलीना यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. रागाच्या भरात अभिनेत्याने देवोलीनाला शिवीगाळही केली होती. यानंतर देवोलीना आणि नाझिम आठ महिने एकमेकांशी बोलले नव्हते पण ते कसेतरी सीन शूट करायचे. देवोलीनाशी झालेल्या भांडणाबाबत नाझिमने नुकताच खुलासा केला आहे.
भांडणाबद्दल मोहम्मद नाझिम म्हणाला…
मोहम्मद नाझिमने ‘टेली मसाला’ला दिलेल्या मुलाखतीत देवोलीनाशी झालेल्या भांडणाबद्दल सांगितलं. “रिहर्सल करता करता काहीतरी बोलणं झालं आणि मी तिला शिवीगाळ केली, एकमेकांना खूप सुनावलं. त्यानंतर आम्ही सात- आठ महिने एकमेकांशी बोलत नव्हतो. पण न बोलताही आम्ही एकत्र सीन करत होतो. दोघेही एकमेकांपेक्षा चांगला सीन करण्याचा प्रयत्न करायचो आणि तो सीन चांगलाच व्हायचा. आमच्यात स्पर्धा होत होती आणि यात एक चांगली गोष्ट अशी की सीन चांगले होऊ लागले. म्हणजे आमचं एकमेकांशी भांडण झालं पण आम्ही शोसाठी चांगलं काम केलं. आम्ही सीनदरम्यान बोलायचो नाही एकमेकांशी त्यामुळे एकमेकांचे सीन खूप बारकाईने बघत होतो.”
सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”
भांडण कसं संपलं?
मोहम्मद नाझिम पुढे म्हणाला, “खरं तर आमच्यात कोणतंही भांडण नव्हतं, पण माझ्यात अहंकार होता. एके दिवशी आम्ही एक सीन शूट करत होतो आणि अचानक हसू लागतो, त्यानंतर भांडण मिटलं. मग आम्ही कधी भांडलो तेही आठवतही नाही.”
‘साथ निभाना साथिया’ ही मालिका २०१० मध्ये सुरू झाली होती आणि सात वर्षांनी २०१७ मध्ये संपली होती.