अभिनेत्री ऐश्वर्या नारकर गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्या विरोचक या खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अनेकदा सेटवरची धम्माल-मस्ती, सहकलाकारांबरोबरचे डान्स व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील अभिनेत्री एका व्हायरल गाण्यावर थिरकल्या आहेत.

Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
shivali parab mother emotional after seeing the look of Mangla movie
‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

हेही वाचा… “तरी नवरा हाच पाहिजे”, वटपौर्णिमेच्या निमित्ताने ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला पती अविनाश यांच्यासाठी खास व्हिडिओ

ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे, एकता, अमृता सकपाळ अनेकदा ट्रेडिंग गाण्यावर रील्स करताना दिसतात. आता या चौघी ‘मेरे प्यार का रस जरा चखना ओय मखना’ या गाण्यावर थिरकल्या आहेत. या डान्ससाठी ऐश्वर्या नारकर यांनी लाल रंगाची साडी नेसली आहे तर एकता, अमृता आणि तितीक्षाने ड्रेस परिधान केला आहे. हटके डान्स स्टेप करत हा व्हिडीओ शेअर ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलाय. “मेकअप रूम एनर्जी बूस्टर्स” असं कॅप्शन ऐश्वर्या नारकरांनी या व्हिडीओला दिलं आहे.

ऐश्वर्या यांचा सहकलाकारांबरोबरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मालिकेच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “तुमच्यामुळे व्हिडीओला चार चांद लागले आहेत” तर दुसऱ्याने कमेंट करत विचारलं, “इंद्राणी कुठे आहे?”

हेही वाचा… ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अपर्णाने साजरी केली वटपौर्णिमा, फोटो शेअर करत म्हणाली…

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. त्रिनैनेच्या मुली नेत्रा आणि इंद्राणी यांच्यावर अजूनही विरोचकाच्या मृत्यूची जबाबदारी आहे. पंचपेटीकीतली पाचवी पेटी सापडल्यानंतर विरोचकाचा मृत्यू होणार असं वाटत असतानाच विरोचक नव्या रुपात राजाध्यक्ष कुटुंबात येतो. आता पुढे काय घडेल याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.

हेही वाचा… ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या भविष्यात ४० वर्षे सलग घडणार ‘ही’ गोष्ट, अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

दरम्यान, या मालिकेत तितीक्षा तावडे नेत्रा नावाची प्रमुख भूमिका साकारत आहे. तर ऐश्वर्या नारकर विरोचकाची भूमिका साकारत आहेत. तर अजिंक्य ननावरे, एकता, अमृता सकपाळ , श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.

Story img Loader