‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ( Saatvya Mulichi Saatvi Mulgi ) मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. अलीकडेच मालिकेत विरोचकाचा वध करण्यात आला. पण विरोचकाच्या वधाचा बदला घेण्यासाठी शतग्रीव नावाच्या असूराची एन्ट्री झाली आहे. डॉ. मैथिली सेनगुप्तामध्ये शतग्रीव असूराने प्रवेश केला असून हा असूर आता नेत्रापर्यंत पोहोचला आहे. नेत्राच्या घरातही या असूराने प्रवेश केला आहे. त्यामुळे आता नेत्रा विरोचकानंतर शतग्रीवचा सामना कसा करणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. म्हणूनच सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मलिका चर्चेत आहे.
तसंच दुसऱ्या बाजूला मालिकेतील कलाकार मंडळी देखील त्यांच्या कामाबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात. विशेष म्हणजे मालिकेतील अभिनेत्रींचे डान्स व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी मालिकेतील अभिनेत्रींनी आगरी गाण्यावर डान्स केला होता; ज्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर ‘वाटाण्याचा गोल दाना’ हे गाणं खूप ट्रेंड होतं आहे. हाच ट्रेंड ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ( Saatvya Mulichi Saatvi Mulgi ) मालिकेतील अभिनेत्रींनी फॉलो केला आहे. या आगरी गाण्यावर ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे, अमृता रावराणे आणि एकता डांगर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहेत. चौघींचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ( Saatvya Mulichi Saatvi Mulgi ) मालिकेतील या अभिनेत्रींच्या डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “एकदम भारी”, “मस्तच”, “लय भारी”, “मस्त ग्रुप”, “खूप भारी”, “जबरदस्त”, “ऐश्वर्या मॅडम तुम्ही खूप भारी डान्स केला आहे”, “अप्रतिमच”, “एक नंबर ताई”, “एक नंबर…सुपर लेडीज”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.