‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे. त्यामुळे ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक ठरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सातव्या मुलीची सातव्या मुलगी’ मालिकेतील कलाकार आपल्या कामाबरोबर सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात. या मालिकेतील अभिनेत्री अनेक मजेशीर व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. त्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल देखील झाले आहेत. अशातच ऐश्वर्या नारकरांनी ऑफस्क्रीन उद्योग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: ‘सुख म्हणजे नक्की…’ फेम माधवी निमकरच्या आई-वडिलांना पाहिलंत का? वाढदिवसानिमित्त व्हिडीओ केला शेअर अन्…

या व्हिडीओत, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अद्वैत म्हणजे अजिंक्य ननावरे ऑनस्क्रीन आई असलेल्या म्हणजेच ऐश्वर्या नारकराचं चित्र काढताना दिसत आहे. अजिंक्यने ऐश्वर्या यांचं रेखाटलेलं चित्र खूप सुंदर आहे; जे पाहून अभिनेत्रींना खूप हसायला येतं. त्यानंतर ऐश्वर्या अजिंक्यच चित्र काढतात. या चित्रावर ‘बदला’ असं लिहिलं आहे.

हेही वाचा – अभिमानास्पद! ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’मध्ये सिद्धार्थ जाधवच्या ‘या’ मराठी चित्रपटाचं स्क्रिनिंग, पोस्ट करत म्हणाला…

हेही वाचा – रुग्णालयात दाखल राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल माहिती; म्हणाली, “गर्भाशयात ट्यूमर असून…”

ऐश्वर्या नारकरांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आलेला आहे. या व्हिडीओवर तितीक्षा तावडेसह अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “बरा उद्योग चाललाय, असेच नवीन उद्योग दाखवतं जा आम्हाला”, “विरोजक इथे पण बदला घ्यायचा सोडणार नाही”, “विरोजक इज रॉकिंग”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेत जबरदस्त वळण, खोट्या अर्जुन मागचा मास्टमाईंड आहे ‘हा’ चेहरा

सध्या मालिकेत काय सुरू आहे?

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत काही दिवसांपूर्वी विरोचकाची सुटका झाली आहे. त्यामुळे नेत्राच्या आयुष्यात नवं संकट घोघावत आहे. आता हे संकट नेत्रा कसं दूर करणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर व अजिंक्य ननावरेंसह श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, मुग्धा गोडबोले-रानडे, रजनी वेलणकर, जान्हवी किल्लेकर, अमृता रावराणे, अनिरुद्ध देवधर, प्रशांत केणी, असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saatvya mulichi saatvi mulgi fame aishwarya narkar shared off screen video pps