‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचे नुकतेच ५०० भाग पूर्ण झाले आहेत. झी मराठी वाहिनीवरील ही मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. खरी नेत्रा कोण? हे अद्वैत आणि राजाध्यक्ष कुटुंबाला कळलं असलं तरी विरोचक रुपाली अस्तिकाचा वापर करून अद्वैतचा अंत करणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचे दिग्दर्शक जयंत पवार यांनी खास प्रेक्षकांसाठी पुढील काही भागांत काय घडणार याचा खुलासा केला आहे. दिग्दर्शक म्हणाले, “जे प्रेक्षक आमच्या मालिकेवर आमच्यापेक्षा जास्त प्रेम करतात, त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की, येत्या काही दिवसांमध्ये अस्तिकाचा अंत होणार आहे. अस्तिकाचा वध नेत्राच्या हातून होणार हे तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर विरोचक एकटा पडेल.”

“पण प्रेक्षकांना हा प्रश्न पडू शकतो की, आधी विरोचकानं अस्तिकाला वाचवलं आहे. कारण- विरोचकाकडे मनोरमाची शक्ती आहे; तर ती अस्तिकाला परत जिवंत करू शकते,” असा प्रश्न विचारला असता दिग्दर्शक म्हणाले, “तेव्हा अस्तिका बेशुद्ध पडली होती आणि विरोचकानं तिला बरं केलं होतं. विरोचकाकडे हीलिंग पॉवर आहे; मृतात्म्याला जिवंत करण्याची शक्ती नाही.”

हेही वाचा… “काश मैं लडका होता” असं ऋतुजा बागवे गौरी नलावडेचा फोटो पाहून का म्हणाली?

विरोचकाची पुढची चाल, रहस्य, चौथ्या पेटीमध्ये काय असणार आणि ते नेत्राला कसं कळणार? तसेच पाचव्या पेटीपर्यंत जाण्याचं कोड नेत्राला सापडणार आहे. या सगळ्या गोष्टी एप्रिल महिन्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत, असंही जयंत पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा… ब्रेकनंतर समांथा रुथ प्रभू अ‍ॅटलीच्या चित्रपटातून करणार पुनरागमन; ‘हा’ सुपरस्टार असणार मुख्य भूमिकेत

दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहे; तर ऐश्वर्या नारकर या खलनायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळतायत. त्याव्यतिरिक्त या मालिकेत अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saatvya mulichi saatvi mulgi netra will kill astika director opened up about upcoming twists in serial dvr