एकेकाळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे ओंकार भोजने होय. ओंकारने त्याच्या इतर प्रोजेक्ट्समुळे हा शो सोडला. ओंकारने अचानक शो सोडल्याने प्रेक्षक त्याचं कारण विचारायचे. इतकंच नाही तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर जेव्हा तो फू बाई फू मध्ये गेला, तेव्हाही त्याला खूप ट्रोल केलं गेलं. या संपूर्ण प्रकारावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन मोटे व सचिन गोस्वामी यांनी त्यांची व ओंकारची बाजू मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिन गोस्वामी व सचिन मोटे भार्गवी चिरमुलेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “ओंकार भोजने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडून गेलाय, पण आमचं अजुनही बोलणं होतं. राजकीय वातावरणामुळे लोकांना असं वाटतं की जातोय म्हणजे दुखावून जातोय, पण तसं नसतं. प्रत्येकाच्या काही कमिटमेंट्स असतात. हास्यजत्रा खूप लोकप्रिय आहे, ती खूप लोकांपर्यंत पोहोचते, साहजिकच ती सिनेक्षेत्रातील कास्टिंग डायरेक्टर्सकडेही पोहोचते. त्यांचंही तिकडेच लक्ष असतं, मग कलाकारांसाठी वेगवेगळ्या संधी येतात.”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडताना ओंकार भोजने काय म्हणाला होता? दिग्दर्शक व निर्माते म्हणाले, “तो खूप…”

पुढे ते म्हणाले, “आम्हाला हास्यजत्रेसाठी महिन्यातून २० दिवस काम करावं लागायचं. सुरुवातीला कलाकाराला मंचाची गरज असते, पण मग कलाकार लोकप्रिय झाल्यावर लोकांना त्यांची गरज जास्त वाटू लागते. त्यांना वेगवेगळ्या संधी येतात, अशावेळी मंच सोडताना बरेच विचार येतात. ज्या मंचाने मोठं केलंय, तो मंच कसा सोडायचा, याबद्दल द्विधा वाटू लागते, मग ते आमच्याशी बोलतात. हास्यजत्रा मोकळ्या वेळेत करता येऊ शकत नाही, त्यासाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो. ओंकारनेही हा विचार केला. तो म्हणाला होता, ‘सर माझ्याकडे तीन सिनेमे आहेत, मला वाईट वाटतं की प्रत्येकवेळी शेड्यूल सोडावं लागतं, बदल करावे लागतात. बाकिच्यांवर त्याचा परिणाम होतो, तसेच मला वेगळी ट्रिटमेंट देताय, असंही इतरांना वाटू शकतं.'”

“ती सोडून गेली तेव्हा…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकांनी सांगितलं विशाखा सुभेदारने शो सोडण्याचं कारण

सचिन मोटे ओंकार भोजनेचं कौतुक करतात. “ओंकार भोजने खूप नम्र व्यक्ती आहे. जेव्हा आम्ही करोना काळात सर्वांचं मानधन वाढवलं होतं, तेव्हा ओंकार समोरून म्हटला होता, ‘सर शक्य नसेल तर माझं नका वाढवू, कारण आधीच ओढाताण चाललीये, त्यात तुम्ही आम्हाला मानधन वाढवून देताय.’ खरं तर कामाचा दबाव होता, त्यामुळे त्याला शो सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.”

“हे नवरे लोक फोटोत…”, हेमांगी कवीच्या ‘त्या’ कमेंटवर वनिता खरातच्या नवऱ्याने दिलं उत्तर; म्हणाला, “मी मनात…”

ओंकार दुसऱ्या शोमध्ये जाण्याबद्दल ते म्हणाले, “तो ‘फू बाई फू’मध्ये गेल्याने खरा वाद सुरू झाला. पण त्याचं कारणही त्याने आम्हाला सांगितलं होतं. ते एक खूप लहान पर्व होतं, हास्यजत्राचं तसं नाही. तुम्हाला हास्यजत्रा करायचं असेल तर मार्च ते मार्च वर्षभराचा करार करावा लागतो. ‘फू बाई फू’चा छोटासा सीझन आहे, मी काही स्किट करेन,’ असं त्याने मला सांगितलं होतं. ओंकारला पहिलं काम आशिषने मिळवून दिलं होतं, त्यामुळे त्याला त्याची जाण होती आणि आशिषच्या प्रोडक्शनमध्ये त्याला काम करायला मिळालं तर तो गेला. त्याचं आमच्याबरोबर अंडरस्टँडिंग आहे, पण आमच्यापलीकडे लोकांच्याच भावना खूप दुखावल्या.”

ओंकारने शो सोडल्यानंतर मैत्री कायम आहे, असं त्यांनी सांगितलं. “ओंकार भोजने तिकडे गेला, याचं प्रेक्षकांना खूप वाईट वाटलं. मग लोकांनी त्याला ट्रोल केलं, जे व्हायला नको होतं. खरं तर हास्यजत्रा सोडल्यानंतरही तो नेहमी भेटतो. हास्यजत्रेशी संबंधित कुठल्याही गोष्टी असल्या तरी तो भेटतो. अगदी समीर चौघुलेचा वाढदिवस, वनिता खरात तसेच दत्तूचं लग्न असो. तो नेहमीच भेटतो. त्याला आता वेळ हवाय हे आम्हाला माहीत आहे, त्याला वाटेल तेव्हा तो सांगेल की आता आपण एकत्र काम करायचं, तेव्हा गोष्टी जमून आल्या तर आम्ही पुन्हा एकत्र काम करू,” असं सचिन गोस्वामी व सचिन मोटे म्हणाले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin mote sachin goswami reaction on onkar bhojane doing fu bai fu after exit from maharashtrachi hasyajatra hrc
Show comments