‘तू-तू मैं-मैं’ ही मालिका छोट्या पडद्यावर आली आणि तुफान लोकप्रिय झाली. ही मालिका संपून अनेक वर्षं होऊन गेली असली तरीही आज प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सासू-सुनेमधील कुरबुरी या मालिकेमध्ये दाखवल्या गेल्या होत्या. तर आता ही मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘तू-तू मैं-मैं’ या मालिकेमध्ये सुप्रिया पिळगावकर सुनेच्या भूमिकेमध्ये होत्या तर अभिनेत्री रीमा लागू यांनी या मालिकेत सासूची भूमिका साकारली होती. ९०च्या दशकांत ही मालिका खूप गाजली. २६ जुलै १९९४ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला. पहिल्या भागापासूनच या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत गेलं. आता याचा दुसरा भाग लवकरच सुरू होणार आहे.

zee marathi lakhat ek aamcha dada new actress entered in the show
सूर्याच्या घरात अचानक आलेली बाई कोण? मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; यापूर्वी ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
Punha Kartvya Aahe
‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत होणार नवीन एन्ट्री; ‘या’ जेष्ठ अभिनेत्री दिसणार गुरूमाँच्या भूमिकेत

आणखी वाचा : “त्या काळी आमच्यात स्पर्धा होती पण…,” सचिन पिळगांवकरांनी उलगडलं महेश कोठारेंबरोबरचं नातं

‘तू-तू मैं-मैं’ या मालिकेचं दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी या मालिकेच्या दुसऱ्या भागाबद्दल मोठा खुलासा केला. ते म्हणाले, “या मालिकेला नव्याने प्रेक्षकांसमोर आणण्याची मी तयारी करत आहे. या मालिकेच्या पहिल्या भागात सुप्रिया सुनेची भूमिका साकारत होती, तर आता या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये ती सासूच्या भूमिकेत दिसेल.”

हेही वाचा : Video: अखेर प्रतीक्षा संपली! सचिन व सुप्रिया पिळगावकर अनेक वर्षांनी एकत्र थिरकणार, व्हिडीओ व्हायरल

पुढे ते म्हणाले, “आताची तरुण पिढी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला तेव्हा शाळेत होती. ही पिढी ही मालिका पाहत लहानाची मोठी झाली आहे. त्या वेळी रीमा लागू यांचं हिंदी मनोरंजनसृष्टीतही मोठं नावं होतं, तर सुप्रिया हिंदी मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी नवी होती. पण मालिका सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांच्या काळातच प्रेक्षकांनी या दोघींनाही अक्षरशः डोक्यावर घेतलं.” सचिन पिळगावकर यांचं हे बोलणं ऐकून आता ही नवी मालिका कधी सुरू होणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader