कॉमेडीयन कपिल शर्मा हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे त्याचा ‘कपिल शर्मा शो’ बंद होणार असल्याची बातमी समोर येत आहे तर दुसरीकडे या कार्यक्रमात एकाहून एक दिग्गज हजेरी लावताना दिसत आहेत. अभिनेत्री महिमा चौधरी आणि मनीषा कोईराला यांनी हजेरी लावली. आता त्यांच्या पाठोपाठ आपले सगळ्यांचे लाडके महागुरु सचिन पिळगांवकर यांनी सहकुटुंब सहपरिवार कपिलच्या या कार्यक्रमात हजेरी लावली.

सचिन पिळगांवर, पत्नी सुप्रिया पिळगांवकर आणि त्यांची मुलगी श्रीया पिळगांवकर यांनी या कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावली. या भागात या तिघांनी कपिलशी आणि लोकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या अन् त्यांच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासाही केला. याच कार्यक्रमात सचिन पिळगांवकर यांनी त्यांना ॲडल्ट चित्रपट बघायला जाताना ओळखपत्र मागतात याचा खुलासा केला आहे.

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

आणखी वाचा : इरफान खानचा शेवटचा चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित; अभिनेत्याच्या लेकाने शेअर केला ट्रेलर

सचिन पिळगांवकर यांची ओळख करून देताना कपिल शर्माने त्यांची थोडी मस्करी केली. ही मस्करी करताना कपिल म्हणाला. “नदिया के पार हा चित्रपट करतेवेळी सचिनजी नुकतेच वयात आले होते, आणि तेव्हापासून आजपर्यंत सचिनजी यांच्यात काहीच फरक पडलेला नाही, ते अजूनही तितकेच तरुण आणि फ्रेश दिसतात. मला सचिनजी यांना विचारायचं आहे की तुम्ही पासपोर्ट काढायला जाता तेव्हा तुम्हाला नवीन फोटो काढावा लागतो की ‘नदीया के पार’च्या वेळचाच चालतो?”

कपिलच्या या म्हणण्यावर एकच हशा पिकला. सचिन पिळगांवर यांनीही कपिलला त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. या प्रश्नावर उत्तर देत सचिन पिळगांवकर म्हणाले, “तुला एक गंमत सांगतो की मी आजही जेव्हा ॲडल्ट चित्रपट बघायला जातो तेव्हा मला माझं ओळखपत्र (आयडी प्रूफ) दाखवावं लागतं.” सचिन पिळगांवकर यांच्या या उत्तरावर सगळेच दिलखुलास हसले. या एपिसोडचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या विकएंडला हा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Story img Loader