‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवटचा एपिसोड आज प्रसारित होणार असून मालिकेचा शेवट गोड होणार आहे, असं सांगण्यात येत आहे. या मालिकेत अंजी व पश्या ही मुख्य पात्रं होती. अंजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल कुंभारने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

“स्वतःच्या मुलीला परदेशात पाठवून हा बहुजनांच्या मुलांची माथी भडकवतोय” या टीकेवर शरद पोंक्षे म्हणाले, “ही गाढवं…”

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Groom from Dubai duped by Instagram bride
दुबईहून लग्नासाठी भारतात आला, इन्स्टाग्रामवरील नवरीनं जबर गंडवला; वरात घेऊन आलेल्या नवऱ्याची अजब फजिती
a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video

अभिनेत्री कोमल कुंभारचा २ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तिला गोकुळ दशवंतने प्रपोज केल्याचं दिसत आहे. गोकुळने कोमलच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज दिलं आणि तिथेच तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. कोमलने होकार दिला आणि गोकुळने तिला अंगठी घातल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

Video: “…हे समजायची कुवत नाही समोरच्यांची”, शरद पोंक्षे यांचे वक्तव्य चर्चेत

“तुम्ही खास आहात, याची जाणीव करून देण्यासाठी एखादी व्यक्ती जेव्हा प्रयत्न करते ती भावना खूप अद्भूत असते. खूप खूप धन्यवाद प्रिय गोकुळ दशवंत, तू मला दिलेले हे सर्वोत्तम सरप्राईज होते,” असं कॅप्शन कोमलने हा व्हिडीओ शेअर करताना दिलंय.

या व्हिडीओत बेटर टुगेदर लिहिलेलं दिसतंय. तसेच कोमल व गोकुळचे सेल्फी आणि फोटोही दिसत आहेत. केकजवळ ठेवलेल्या बोर्डावर वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको, असं लिहिलेलं आहे. दरम्यान, गोकुळ दशवंत हा कलाविश्वात अभिनेता, लेखक, दिग्दर्शक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Story img Loader