‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. साडे तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेचा गोड शेवट होणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेच्या शेवटच्या १०००व्या एपिसोडचे चित्रिकरण पार पडले. यानिमित्ताने हा क्षण संपूर्ण टीमने साजरा केला. यावेळी कलाकार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील सूर्या दादा म्हणजे अभिनेते सुनील बर्वे आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत.

अभिनेते सुनील बर्वे मालिकेतून नाही तर चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सुप्रसिद्ध संगीतकार, गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली. याच चित्रपटातून अभिनेते सुनील बर्वे नव्या भूमिकेत दिसणार आहेत.

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात सुनील बर्वे मुख्य भूमिकेत म्हणजेच सुधीर फडके यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत; तर अभिनेता आदिश वैद्य तरुणपणीचे बाबूजी साकारणार आहे. याविषयी सुनील बर्वे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, “हा अनुभव कसा असेल माहिती नाही, पण मी आता नुकतीच छोटीशी सुधीर फडके यांची झलक सादर करताना दडपण आलं होतं. कारण बाबूजींचे चाहते जगभर इतके पसरले आहेत; म्हणजे आजच्या पिढीपर्यंत त्यांची गाणी ऐकली जातात. गीतरामायण असू दे, भावगीत असू दे किंवा चित्रपट गीत असू दे. तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेन की, सगळ्यांनी त्यांच्या प्रार्थना माझ्यासाठी ठेवाव्यात, मी जी जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न करतोय, ती मला व्यवस्थितरित्या पार पाडता यावी.”

हेही वाचा – “स्त्रियांवरील अत्याचाराबद्दल तोंडातून ब्र न काढणारे…”, मराठी अभिनेत्याने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, “OTT वरील काल्पनिक…”

हेही वाचा – “पाल, सरडा, साप यांना मी हाताने उचलू शकते पण….” अभिनेत्री जुई गडकरीला वाटते ‘याची’ भीती, म्हणाली “जवळ आलं तरी…”

“मला वैयक्तिक असं वाटतं की, जीवनपटासाठी एखाद्या व्यक्तीची व्यक्तिरेखा निभावणं, त्याची ती एक थीन लाईन असते. कलाकारासाठी ते खूप कठीण असतं, ते आव्हानात्मक असतं. कारण थोडं जास्त केलं तर ती नक्कल वाटू शकते आणि जर का तुम्ही कमी केलंत, तर ती व्यक्तिरेखा वाटू शकणार नाही. त्यामुळे मला त्याचंच टेन्शन आहे की, ती थीम सांभाळत हा चित्रपट करण्याची इच्छा आहे. पण, दिग्दर्शक योगेश देशपांडेला इतका आत्मविश्वास आहे, तर मला असं वाटतं ५० टक्के काम योगेश सांभाळून घेणार आणि ५० टक्के जोर मला लावायचा आहे, तो मी १०० टक्के लावणार आहे. भूमिका चांगली निभावण्याचा मी प्रयत्न करणार आहे.”

हेही वाचा – “तब तक के लिये.. अलविदा”; ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अभिनेत्रीच्या पोस्टने वेधले लक्ष; म्हणाली…

पुढे सुनील बर्वे म्हणाले की, “गीतरामायणामध्ये ५२ गाणी आहेत. गाण्यांची खूप मोठी कडवी आहेत, हे गदिमा आणि बाबूजींनी कसं जुळवून आणलं, याच्याविषयी मला विलक्षण कुतूहल आहे. मला असं सारखं वाटतं की, त्यांची जेव्हा सिटिंग्ज होत असतील, तेव्हा आपल्यासारखे सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर कोणी टिपून ठेवलं असेल का? त्यांच्या चर्चा टिपून ठेवल्या असतील का? त्या बघायला मिळतील का? हे चित्रपटात काम करण्यासाठी उपयोगी पडेल म्हणून नाही, तर मला हे कुतूहल आहे की, यांनी हे कसं जमवून आणलं. त्यामुळे अर्थातच मला खूप आनंद होतोय की, या चित्रपटाचा मी भाग आहे आणि तेसुद्धा बाबूजींवर चित्रपट बनवतोय. इतकी मोठी भूमिका मिळाली आहे, त्यामुळे माझ्या स्ट्रगल पीरियडचा उपयोग होतोय. आता हातात काहीतरी चांगली गोष्ट मिळतेय, असं मला मनापासून वाटतंय.”

दरम्यान, या चित्रपटात सुनील बर्वे यांच्या व्यतिरिक्त मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, सुखदा खांडकेकर, अनुजा मोडक, धिरेश जोशी, शरद पोंक्षे ही कलाकार मंडळी आहेत.

Story img Loader