गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार मंडळी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवीन आलिशान घर, गाडी घेताना दिसत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी-दिघे, अपूर्वा मोरे, मिताली मयेकर, सोनाली कुलकर्णी, ऋतुराज फडके या कलाकारांनी नवी गाडी अन् घर घेतलं आहे. याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आता या यादीत ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अभिनेत्रीची भर पडली आहे. तिने देखील दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवी आलिशान गाडी घेतली आहे; ज्याचे फोटो तिने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत आता दिसणार नाही ‘मॅडहेड देवकी’; अभिनेत्री पोस्ट करत म्हणाली, “आज माझा…”

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ही अभिनेत्री म्हणजे कोमल कुंभार. कोमलने आलिशान आणि महागडी गाडी खरेदी केली आहे. “माझी गाडी…” लिहित अभिनेत्रीने गाडीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये कोमलबरोबर तिचा बॉयफ्रेंडही पाहायला मिळत आहे. ह्युंदाईची जबरदस्त गाडी अभिनेत्रीने घेतली आहे.

हेही वाचा – Video: हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावात’ शोमधील दोन दमदार स्पर्धक जाहीर, कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या…

सध्या अभिनेत्रीने नवी गाडी घेतल्यामुळे कलाकार मंडळींसह चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील वैभव म्हणजेच अभिनेता अमेय बर्वेने कोमलच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहीलं आहे की, “अंजी मनापासून अभिनंदन,” तसेच अभिनेत्री साक्षी गांधी, रेश्मा शिंदे, गिरीजा प्रभु, आकाश नलावडे यांनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – भावंडांबरोबर जुई गडकरीने ‘अशा’ पद्धतीने केल्या होत्या चोऱ्या; अभिनेत्री किस्सा सांगत म्हणाली…

दरम्यान, ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका होती. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत कोमलने अंजली हे पात्र साकारलं होतं. जे प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलंच पसंतीस उतरलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahkutumb sahaparivar fame actress komal kumbhar bought new car pps