‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एक हजार भागांचा टप्पा पूर्ण करून या मालिकेचा गोड शेवट होणार आहे. काल मंगळवारी (२५ जुलै) या मालिकेच्या शेवटच्या एक हजारव्या भागाचे चित्रीकरण झाले. यानिमित्ताने संपूर्ण टीमने एकत्र येऊन हा क्षण साजरा केला. ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. दरम्यान, सुरू म्हणजे अभिनेत्री नंदिता धुरीने सोशल मीडियावर या मालिकेविषयी पोस्ट लिहिली आहे; जी सध्या खूपच चर्चेत आहे.
अभिनेत्री नंदिता धुरीने मालिकेतील कलाकारांच्या पायांचा फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर एक शायरी लिहिली आहे. “फिर मिल बैठेंगे.. फिर गुफ्तगू होगी.. आपके हमारे किस्सों से.. ये महफिल फिर जवां होगी! तब तक के लिये.. अलविदा. सर्वांना खूप सारं प्रेम. सर्वांची खूप आठवण येईल,” असे नंदिताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
हेही वाचा – नम्रता संभेरावसाठी ‘या’ अभिनेत्रीने बनवला खास चहा; पाहा व्हिडीओ
नंदिताच्या या पोस्टवर मालिकेतील इतर कलाकारांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केले आहे. तसेच बऱ्याच नेटकऱ्यांनी लिहिले आहे, “तुमच्या सगळ्यांची आम्हाला आठवण येईल.”
हेही वाचा – “हॉलीवूड अमूक, हॉलीवूड तमूक…”, शाहीद कपूरच्या पत्नीचे ‘बार्बी’ चित्रपटाबद्दल वक्तव्य; म्हणाली…
दरम्यान, ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही कौटुंबिक मालिका २०२० पासून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. जबरदस्त कलाकार आणि कथा यांची उत्तम सांगड असल्यामुळे या मालिकेने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवलेय. पण आता हे मोरे कुटुंबीय प्रेक्षकांची लवकरच रजा घेणार आहेत. यामागचे कारण टीआरपी नसून कथा आहे. या मालिकेची कथा पूर्ण होत आहे. त्यामुळे या मालिकेचा शेवट गोड होताना पाहायला मिळणार आहे.