दसऱ्याच्या मुहूर्तावर धक धक गर्ल माधुरी दीक्षितने एका मराठी चित्रपटाची घोषणा केली होती. ‘पंचक’ असं या चित्रपटाचं नाव असून माधुरी व तिचे पती श्रीराम नेने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारे, सतीश आळेकर, दीप्ती देवी पाहायला मिळणार आहेत. शिवाय ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अभिनेत्री देखील झळकणार आहे.

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ नाही तर ‘ही’ स्टार प्रवाहवरील मालिका होणार ऑफ एअर? जयदीप-गौरी ‘या’ वेळेत येणार प्रेक्षकांच्या भेटीस

काही महिन्यांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. तब्बल साडे तीन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरात पोहोचला होता. अंजी, पशा, सूर्या, सरू, वैभ्या, अवनी, ओंकार या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक घर निर्माण केलं होतं. त्यामुळे या भूमिकांविषयी अजूनही बोललं जात. अशात आता या मालिकेतील सरू म्हणजेच अभिनेत्री नंदिता पाटकर माधुरी दीक्षितच्या चित्रपट पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – लक्ष्मीकांत बेर्डेंच्या गाडीवर चढून चाहत्यांनी…; ‘एक होता विदूषक’च्या चित्रीकरणाच्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

नंदिताने ‘पंचक’ या चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यामुळे नंदिता माधुरीच्या आगामी चित्रपटात झळकणार असल्याचं निश्चित झालं आहे. या चित्रपटात ती कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. माधुरी दीक्षितचा ‘पंचक’ चित्रपट पुढील वर्षी ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा – लक्ष्मीकांत बेर्डेंच्या वाढदिवसानिमित्ताने लेकीने शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली, “तुमची…”

हेही वाचा – Laxmikant Berde Birthday: मी आलो.. मी पाहिलं.. मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं

दरम्यान, यापूर्वी नंदिताचा ‘बटर चिकन’ हा लघुपट प्रदर्शित झाला होता. १५ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या लघुपटात ती सुमन या भूमिकेत झळकली होती. यात तिच्याबरोबर अभिनेता सुशील इनामदार पाहायला मिळाला होता.

Story img Loader